Ganeshotsav 2025 – यंदा ‘मुंबईच्या राजा’साठी रामेश्वरम मंदिराची प्रतिकृती

'मुंबईचा राजा’ अशी ख्याती असलेल्या लालबागच्या गणेशगल्लीत यंदा तामीळनाडूमधील रामेश्वरम मंदिराची भव्यदिव्य अशी प्रतिकृती उभारण्यात येत आहे. 40 फूट उंच आणि 160 फूट रुंद असे हे मंदिर आहे. मंदिर परिसरातील 12 पुंडांचाही देखाव्यात समावेश असणार आहे. प्रवेशद्वारासमोर मोठा नंदी असणार आहे.

‘मुंबईचा राजा’ मंडळाचे यंदाचे 98वे वर्ष आहे. मंडळातर्फे दरवर्षी मंदिरांसह ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांचा देखावा मुंबईच्या राजासमोर उभारण्यात येतो. ज्या भक्तांना वेळेअभावी वा पैशाअभावी विविध मंदिरे तसेच तीर्थक्षेत्र पाहता येत नाहीत त्यांच्यासाठी मंडळाच्या वतीने ही संकल्पना दरवर्षी राबवली जाते, असे मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी सांगितले.

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक कुणाल साबळे हे मंदिराची प्रतिकृती उभारणार असून बाप्पाची 22 फुटांची भव्य दिव्य मूर्ती आकाश तिरमल हे नव्या दमाचे मूर्तिकार साकारणार आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांची फौज

सुरक्षेच्या बाबतीत यंदाही योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे क्लोज सर्किट पॅमेरे, जागोजागी व्हॉलिंटीयर आणि सुरक्षा रक्षकांची फौज तैनात असणार आहेत.

Comments are closed.