गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला उत्तर प्रदेशातून अटक, मीरा-भाईंदर पोलिसांची कारवाई

विरार येथील बिल्डर समय चौहान याच्या हत्येप्रकरणी दाऊद इब्राहिमचा हस्तक व आंतरराष्ट्रीय गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला आज उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली. मीरा-भाईंदर पोलिसांनी फतेहगढ मध्यवर्ती कारागृहातून त्याला ताब्यात घेतले. ठाकूर याला खास विमानाने मुंबईत आणले जाणार असून उद्या मंगळवारी त्याला ठाण्याच्या मकोका न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ठाकूर हा मुंबईच्या जेजे हत्याकांडातील प्रमुख आरोपी असून तो यूपीच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. समय चौहान या बिल्डरची 26 फेब्रुवारी 2022 रोजी मनवेलपाडा येथे गोळय़ा झाडून हत्या झाली होती. या प्रकरणातही ठाकूर मुख्य आरोपी होता. त्याच्यासह 13 जणांना मोक्काही लावण्यात आला होता. 2019 पासून तो उपचाराच्या नावाखाली बनारस हिंदू विद्यापीठाच्या सर सुंदरलाल रुग्णालयात होता. त्यामुळे त्याला अटक करता आली नव्हती.

Comments are closed.