Thane News – शहापूरमध्ये घडली दुर्दैवी घटना, विसर्जनावेळी 5 तरुण बुडाले; एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता तर दोघांना वाचवण्यात यश

गणपती विसर्जनावेळी शहापूरमध्ये दुर्दैवी घटना घडली. आरती सुरू असताना नजीकच्या लहान बंधाऱ्यातून पोहण्यासाठी एका तरुणाने उडी मारली. यावेळी त्याला तरुणा बुडताना पाहून त्याला वाचविण्यासाठी गेलेले पाच तरुण बुडाल्याची कार्यक्रम आसनगाव येथील रेल्वे पुलाखालून वाहणाऱ्या आशीर्वाद नदीत घडली. पाच तरुणांचा शोध सुरू असताना एक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे. तर वाचविण्यात आलेल्या दोघांवर शहापूर उपजिल्हारुग्णालयात उपचार सुरू आहेत. आसनगाव येथील मुंडेवाडी येथील शिवतेज मित्र मंडळाच्या गणपती विसर्जनाची तयारी सुरू असताना आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

ठाण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर कडक ‘वॉच’; ८ हजार पोलीस, ८०० होमगार्ड, १०२ ड्रोनचा भिरभिरता पहारा

शिवतेज मित्र मंडळातील प्रतीक मुंडे असे मृत तरुणाचे नाव आहे. रामनाथ घारे आणि भगवान वाघ यांच्यावर शहापूर उपजिल्हारुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुलदीप जॅकेरे आणि दत्ता लोटे यांचा जीव रक्षक संघशिवतेज मित्र मंडळातील तरुणांकडून शोध सुरू आहे. आशीर्वाद नदी काठी मंडळाच्या गणपती विसर्जनाआधी आरती सुरू होती. त्यावेळी दत्ता लोटे हा पोहण्यासाठी नजीकच्या बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या आशीर्वाद नदीत गेला होता. गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नदी ड्रेनेज दुथडी भरून वाहत असल्याने आशीर्वाद नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने दत्ता पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी प्रतीक मुंडे, रामनाथ घारे, भगवान वाघ व कुलदीप जॅकेरे यांनीही पाण्यात उड्या मारल्या. यावेळी प्रसंगावधान राखत मित्रांच्या मदतीने योगेश्वर नाडकार याने पाण्यात उतरून रामनाथ व भगवान या दोघांना मोठ्या शिताफीने पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर जीवरक्षक संघ व मंडळातील मित्रांनी शोध घेतल्यानंतर प्रतीक मुंडे या तरुणाला बाहेर काढले. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, कुलदीप जॅकेरेदत्तू लोटे या तरुणांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले?

मिरा भाईंदर पोलिसांकडून तेलंगणा राज्यातील ड्रग्स फॅक्टरी उद्ध्वस्त, ड्रग्स कारखान्यात अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांचा सहभाग

Comments are closed.