लिंबू-पाण्यावरही ‘गॅस संकट’

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण युद्धामुळे देशात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठय़ावर निर्बंध आल्यामुळे अनेक रेस्टॉरंट संकटात आले आहेत. सुरू  असलेल्या काही हॉटेलांनी ‘गॅस क्रायसीस चार्ज’ लावायला सुरुवात केली आहे. मात्र बंगळुरू येथील एका बिलाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. एका युझरने ‘एक्स’वर या बिलाचे छायाचित्र पोस्ट केले. त्याने लिंबू-पाणी ऑर्डर केले होते. त्या बिलावर ‘गॅस क्रायसीस चार्ज’च्या नावाने एकूण बिलाच्या 5 टक्के जास्त असे 17.01 रुपये जोडले होते. लिंबू-पाण्यासाठी गॅसची गरज नाही. त्यामुळे या कॅफेने 5 टक्के शुल्क कसे घेतले, असा प्रश्न नेटकऱयांनी उपस्थित केला आहे. लिंबू गॅसवर गरम करून त्याचे पाणी टाकले का आणि पुढे बंगळुरूमध्ये हवामान बदलाचेही शुल्क घेतील का, असे प्रश्न नेटकऱयांनी उपस्थित केले आहेत.

Comments are closed.