टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये गौतम गंभीर संतापला, रागाच्या भरात थेट शिवीगाळ; अचानक कोचला झा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: दुबईच्या मैदानावर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक रोमांचक सामना खेळला जात आहे. दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहेत. या सामन्यादरम्यान अनेक खास क्षण पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या विकेट पडल्या तेव्हा भारतीय खेळाडू आणि चाहतेच उत्साहित नव्हते, तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील यावेळी खूप आनंदी होते. पण स्टीव्ह स्मिथची विकेट पडल्यानंतर गौतम गंभीरचा जरा ताबा सुटला आणि रागाच्या भरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

रागाच्या भरात थेट शिवीगाळ

जेव्हा टीम इंडियाला ट्रॅव्हिस हेडची विकेट मिळाली, तेव्हा गौतम गंभीरही खूप आनंदी झाला आणि त्याने दोन्ही हात हवेत वर करून टाळ्या वाजवल्या. पण स्टीव्ह स्मिथ आऊट झाल्यावर गौतम गंभीरने जरा हटके सेलिब्रेशन केले. स्मिथची विकेट पडताच गौतमने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तिथे त्याने त्याच्या सीटवर बसून रागाच्या भरात शिवीगाळ सुरू केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

स्टीव्ह स्मिथने खेळली शानदार खेळी

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारताविरुद्धच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्टीव्ह स्मिथने शानदार खेळी खेळली. तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने 96 चेंडूंचा सामना करत 73 धावा केल्या. या अर्धशतकात त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि एक षटकार आला. स्टीव्ह स्मिथची शिकार मोहम्मद शमीने फुल-टॉस बॉलवर केली. शमीने ऑस्ट्रेलियन कर्णधाराला बाद केले आणि पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

ऑस्ट्रेलियाचा खेळ 264 धावांवर खल्लास

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत आणि भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा डाव 49.3 षटकांत 264 धावांवर संपला. स्टीव्हच्या 73 धावांव्यतिरिक्त, अॅलेक्स कॅरीने 57 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी केली. ट्रॅव्हिस हेडने 33 चेंडूत 39 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

हे ही वाचा –

India vs Australia : ‘अरे ए…तुला काय…’ कुलदीपनं बॉल सोडताच विराट लालेलाल; रोहितनेही झाप झाप झापलं, मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video

अधिक पाहा..

Comments are closed.