Asia Cup: आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये नवा जोश, प्रशिक्षक गंभीर यांनी संघाला दिला विजयाचा मंत्र!
आशिया कप (Asia Cup 2025) आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. 9 सप्टेंबरला अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात पहिला सामना खेळला जाणार आहे. तर टीम इंडिया आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध खेळेल. स्पर्धेसाठी भारतीय संघ गुरुवारीच दुबईला पोहोचला होता, जिथे शुक्रवारी खेळाडूंनी पहिल्या सराव सत्रात भाग घेतला. आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी टीम इंडियामध्ये जोश भरला आहे. गंभीर यांच्यासोबत भारतीय खेळाडूंचीही इच्छा असेल की, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर 2025 मध्ये ते दुसरं मोठं विजेतेपद पटकावावं.
BCCI ने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अष्टपैलू शिवम दुबेने (Shivam Dube) गौतम गंभीर यांनी संघाला दिलेले प्रेरणादायी शब्द सांगितले. दुबे म्हणाला, टीमचं वातावरण खूप छान आहे, त्यामुळे खूप मजा येते आहे. आज आलो आणि परत एकदा वाटलं की आपण पुन्हा छाप पाडण्यासाठी सज्ज आहोत. प्रशिक्षक नेहमी प्रत्येक खेळाडूला हेच सांगतात की, जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता, तेव्हा तुमच्याकडे काहीतरी नवीन करण्याची संधी असते.
आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. गंभीर यांना अपेक्षा आहे की, प्रत्येक खेळाडू देशासाठी पूर्ण ताकदीनिशी खेळेल. त्यांनी सांगितलं, माझ्या आजूबाजूला इतके उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि त्यांना सराव करताना पाहून माझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू येतं. ते ज्या पद्धतीने स्वतःला झोकून देतात, आशिया कपमध्ये मला त्यांच्याकडून अशीच अपेक्षा आहे.
Comments are closed.