कधी कधी ऐकूनही घ्या..’ गौतम गंभीरवर चाहत्यांची टीका, सोशल मीडियावर जोरदार नाराजी

रविवारचा सुट्टीचा दिवस आणि त्या दिवशी भारतीय चाहत्यांनी जे पाहिलं, त्याची कुणालाच कल्पना नव्हती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa) कसोटी सामन्यात भारत 1-0 अशी आघाडी घेईल, अशी साऱ्या देशाची अपेक्षा होती. परंतु मैदानावर दृश्य वेगळंच पाहायला मिळालं.

कोलकात्यातल्या ईडन गार्डनवर भारतीय फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या स्पिनरांसमोर अक्षरशः गुडघे टेकले. टीम इंडिया कोसळली आणि टेम्बा बावुमाच्या (Temba Bavuma) संघाने शुबमन गिलच्या (Shubman gill) टीमला 30 धावांनी धक्का दिला. हा पराभव इतका अनपेक्षित होता की हेड कोच गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) थेट करोडो चाहत्यांच्या निशाण्यावर आले.

सोशल मीडियावर प्रचंड नाराजी उसळली. चाहते अक्षरश संतापले. कुणीही अपेक्षित नसलेल्या या निकालामुळे चाहत्यांचा रोष उफाळून आला. संयमित किंवा शांत स्वभावाचा फॅनसुद्धा इतका नाराज झाला होता की, त्याचा राग थेट शब्दांत उतरला नाही कोणती वाक्यांची तोडफोड, नाही बिनडोक आरोप… फक्त मनातलं खरंखुरं दुःख आणि राग सरळ सांगून टाकला.

भारतीय क्रिकेटकडून अपेक्षा खूप असतात, पण जेव्हा टीम असं अचानक कोसळते, तेव्हा फॅन्सचा हा उद्रेक अगदी स्वाभाविकच आहे.

Comments are closed.