गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षकपदी कायम ठेवणार की हटवणार?; BCCI चा निर्णय ठरला, महत्वाची माहिती सम
बीसीसीआय गौतम गंभीरच्या राजीनाम्यावर भारत विरुद्ध एसए: दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण अफ्रिकेने भारताचा 2-0 अशा फरकाने पराभव (India vs South Africa 2nd Test) केला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात (Ind vs SA 2nd Test) दक्षिण आफ्रिकेनं भारताला 408 धावांनी पराभूत केलं. भारताच्या या कामगिरीवरुन सध्या मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. तसेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली जातेय. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने 18 पैकी 10 कसोटी सामने गमावले आहेत, ज्यात गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध आणि आता घरच्या मैदानावर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पराभवाचा समावेश आहे. दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात का?, असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. यावर गौतम गंभीर म्हणाला की, याबाबत बीसीसीआय निर्णय घेईल. पण मी तोच व्यक्ती आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि आशिया कप जिंकला. पण तुम्ही लवकर विसरले, असं गौतम गंभीरने (Gautam Gambhir Resignation) उत्तर दिले. त्यामुळे बीसीसीआय गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षकपदी कायम ठेवणार की हटवणार याची चर्चा रंगली होती. परंतु दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतरही गौतम गंभीर टीम इंडियाच्या मुख्यप्रशिक्षकपदी कायम राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
गौतम गंभीर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पुढेही काम पाहणार- (BCCI On Gautam Gambhir Resignation)
गौतम गंभीर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पुढेही काम पाहणार आहे. बीसीसीआयकडून कोणताही मोठा निर्णय घेतला जाणार नाहीय. गौतम गंभीरसोबतचा करार 2027 पर्यंत आहे आणि विश्वचषक देखील जवळ आला आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून कोणताही मोठा निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याची माहिती एक्सप्रेस वृत्ताने दिली आहे.
🚨 गंभीर मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार. 🚨
– बीसीसीआय कोणत्याही गुडघेदुखीच्या प्रतिक्रियेच्या मूडमध्ये नाही. कोणतेही मोठे निर्णय होणार नाहीत.
– गौतम गंभीरचा करार 2027 पर्यंत आहे आणि वर्ल्ड कपही जवळ आला आहे. (एक्स्प्रेस स्पोर्ट्स). pic.twitter.com/FrNf6ChZVs
— मुफद्दल वोहरा (@mufaddal_vohra) 27 नोव्हेंबर 2025
सध्याच्या टीम इंडियाच्या संघाकडे कमी अनुभव- गौतम गंभीर (Gautam Gambhir On Team India)
मी याआधीही सांगितले आहे की, टीम इंडियाचा हा असा संघ आहे, ज्याच्याकडे अनुभव कमी आहे आणि या संघाला सतत शिकत राहण्याची गरज आहे. सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे, असं गौतम गंभीरने सांगितले. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी गौतम गंभीरनं स्वीकारली आहे. दोष सर्वांचा पण सुरुवात माझ्यापासून करा, असंही गौतम गंभीरने म्हटलं आहे. कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी अत्यंत प्रतिभावान क्रिकेटपटूंची आवश्यकता नाही. आम्हाला मर्यादित कौशल्ये आणि मजबूत मानसिकता असलेल्या खेळाडूंची आवश्यकता आहे, असं गौतम गंभीरने सांगितले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.