शिवम दुबेच्या प्रश्नावर गौतम गंभीरचे स्पष्ट उत्तर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱया टी-20 सामन्यात अष्टपैलू शिवम दुबेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले की, संघ खेळाच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये फलंदाजीच्या क्रमात लवचिकता कायम ठेवावी लागते.

ईशान किशन बाद झाल्यानंतर फॉर्मात असलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरच्या जागी शिवमला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. शिवमला 10 चेंडूंमध्ये फक्त 7 धावाच करता आल्या आणि त्याला मिळालेल्या बढतीवरून प्रश्नांची सरबत्ती झाली. याबाबत गंभीर म्हणाले, ‘आम्ही बऱयाच काळापासून त्याचा अशा प्रकारे वापर करत आलो आहोत. आम्ही विश्वचषकात आणि त्यापूर्वीही असे केले होते. आम्ही त्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची ही पहिली वेळ नव्हती. मधल्या षटकांमध्ये हिंदुस्थानला अपेक्षेप्रमाणे जलद धावा करता आल्या नाहीत.’

Comments are closed.