गौतम गंभीरने रणजी ट्रॉफी संघाचे प्रशिक्षक बनायला हवं.., इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य
कसोटी क्रिकेटमधील (Test Cricket) टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे बीसीसीआय सध्या नाखूष आहे. त्यामुळेच, आता कसोटी फॉरमॅटसाठी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (V. V. S Laxman) यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते, अशा चर्चा सुरू आहेत. कसोटीतील या अपयशाचे खापर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर (Gautam Gambhir) फोडले जात आहे. दरम्यान, इंग्लंडच्या एका माजी खेळाडूने गंभीरला चक्क रणजी ट्रॉफीमध्ये कोचिंग करण्याचा सल्ला दिला आहे.
भारतीय वंशाचा माजी इंग्लिश खेळाडू मोंटी पनेसरने (Monty Panesar) एका मुलाखतीत गंभीरच्या कोचिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तो म्हणाला, गौतम गंभीर मर्यादित षटकांच्या (White Ball) क्रिकेटमध्ये नक्कीच चांगला प्रशिक्षक आहे कारण तिथे त्याला यश मिळाले आहे. पण त्याने आधी रणजी ट्रॉफीमध्ये कोचिंग करायला हवे. रेड बॉल क्रिकेटमध्ये (कसोटीत) संघ कसा बांधायचा, हे त्याने रणजीमधील अनुभवी प्रशिक्षकांशी बोलून समजून घेतले पाहिजे. सध्या भारतीय कसोटी संघ कमकुवत झाला आहे, हे सत्य आहे. जेव्हा तुम्ही तीन मोठ्या खेळाडूंना निवृत्त करता, तेव्हा नवीन खेळाडूंना तयार करणे कठीण असते.
सध्या टीम इंडिया 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीला लागली आहे. जर भारताने ही स्पर्धा जिंकली, तर कदाचित गंभीरला कसोटी प्रशिक्षक म्हणून अजून एक संधी मिळू शकते. मात्र, तिथे पराभव झाला तर त्याच्या पदावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होईल. रिपोर्टनुसार, लक्ष्मणच्या नावाची चर्चा जोरात असल्याने गंभीरवरचा दबाव आता प्रचंड वाढला आहे.
Comments are closed.