कोचची कृपा संपली! BCCI ने गौतम गंभीरच्या लाडक्याला दाखवला बाहेरचा रस्ता, कोणाला मिळाली एन्ट्री?


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका संघ 2025 : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा (India Test Squad vs South Africa 2025) केली आहे. ही मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होईल. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-20 मालिकेत खेळणारा शुभमन गिल (Shubman Gill) संघाचे नेतृत्व करेल. दरम्यान, अनेक खेळाडूंचं नशीब खुललं, पण सगळ्यात मोठा धक्का बसला, तो म्हणजे गौतम गंभीरचा लाडका खेळाडू हर्षित राणाला (Harshit Rana) संधी मिळाली नाही. काही महिन्यांपूर्वीच तो तिन्ही फॉर्मेटमध्ये कोचच्या आशीर्वादाने टीम इंडियाचा भाग बनला होता. मात्र यावेळी निवड समितीनं स्पष्ट संदेश दिला की, “टीममध्ये जागा आता शिफारसमुळे नाही, तर कामगिरीने मिळेल.”

कोचची कृपा संपली, राणाचा काळ गेला

सुरुवातीच्या फॉर्मने त्याने आशा निर्माण केल्या होत्या, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर हर्षितचा प्रभाव तितका जाणवला नाही. ना त्याच्या गोलंदाजीत ती धार दिसली, ना आकडेवारीत दमदार परफॉर्मन्स. त्यामुळे निवडकर्त्यांकडे त्याला बाहेर ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. हर्षितचा बाहेर करणं हे फक्त एका खेळाडूचं प्रकरण नाही, हा टीम इंडियाच्या  नव्या विचाराचा आरंभ आहे.

तीनही फॉर्मेटचा खेळाडू, पण आता बाहेर

हर्षित राणा गेल्या काही महिन्यांपासून तिन्ही फॉर्मेटमध्ये दिसत होता. इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरही तो मोहम्मद शमीच्या जागी घेतला गेला होता. त्यामुळे कोच गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजीत अगरकर यांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी जाहीर झालेल्या स्क्वॉडमधून हर्षितचं नाव गायब आहे. त्याच्या ऐवजी आकाशदीपची एन्ट्री आणि शमीचं ड्रॉप होणं, या दोन्ही गोष्टींनी चर्चेला चांगलंच ऊत आलं आहे.

‘फेवरेट क्लब’ संपला, ‘रिझल्ट क्लब’ आला

भारतीय संघाची घोषणा झाल्यावर हे स्पष्ट दिसत आहे, आता टीम इंडिया ‘फेवरेट क्लब’वर नाही, तर ‘रिझल्ट क्लब’वर चालणार. म्हणजेच, परफॉर्मन्सचं पासपोर्ट नसताना टीममध्ये प्रवेश नाही. चाहत्यांचं म्हणणं आहे की हर्षित राणा अजून युवा आहे, त्याच्याकडे पुन्हा परत येण्याची संधी नक्की आहे. त्यामुळे आता टीम इंडिया मध्ये स्थान मिळवायचं असेल, तर नाव नाही, कामगिरी करावी लागेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा कसोटी संघ- (India Test Squad vs South Africa 2025 Test)

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.

भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs SA Schedule)

  • पहिली कसोटी: 14-18 नोव्हेंबर (ईडन गार्डन्स)
  • दुसरी कसोटी: 22-26 नोव्हेंबर (एसीए स्टेडियम)
  • पहिला एकदिवसीय सामना: 30 नोव्हेंबर (जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम)
  • दुसरा एकदिवसीय सामना: 3 डिसेंबर (शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम)
  • तिसरा एकदिवसीय सामना: 6 डिसेंबर (एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम)
  • पहिली टी-20: 9 डिसेंबर (बारबती स्टेडियम, कटक)
  • दुसरा T20: 11 डिसेंबर (PCA स्टेडियम)
  • तिसरा T20: 14 डिसेंबर (HPCA स्टेडियम)
  • चौथी टी-20: 17 डिसेंबर (एकाना स्टेडियम)
  • पाचवी टी-20: 19 डिसेंबर (नरेंद्र मोदी स्टेडियम)

हे ही वाचा –

Indian team to meet PM Narendra Modi : भारतीय महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक पुढे केला, पण PM मोदींनी हातही लावला नाही; दिल्लीत नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.