गौतम गंभीरचा राडा, तब्बल 2 मिनिटं बाचाबाची; ओव्हलच्या ग्राऊंड्समनने नेमकं काय केलं?, VIDEO

गौतम गार्बीरने व्हिडिओ इंड. भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng 5th Test Match) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलैपासून खेळवला जाणार आहे. याचदरम्यान काल (29 जुलै) टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि द ओव्हल मैदानाचे मुख्य ग्राऊंड्समन ली फोर्टिस (Gautam Gambhir Fights Video) यांच्यात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाले. जवळपास 2 मिनिटांपेक्षा जास्तवेळ गौतम गंभीर आणि ली फोर्टिस यांच्यात वाद सुरु होता. यादरम्यान व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

नेमकं काय घडलं? (Gautam Gambhir Fights Video)

गौतम गंभीर आणि ली फोर्टिस यांच्यात वाद झाला, तेव्हा टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक देखील उपस्थित होते. पत्रकार परिषदेत सीतांशू कोटक यांनी नेमका वाद कशावरुन झाला, याची सर्व माहिती दिली.
सीतांशू कोटक म्हणाले की, ली फोर्टिस यांनी आम्हाला येऊन सांगितले की, विकेटपासून 2.5 मीटरच्या अंतरावर उभे रहावे लागेल आणि दोरीच्या बाहेरून विकेट पहावी लागेल. मी माझ्या करिअरमध्ये याआधी असे कधीच पाहिले नव्हते. तसेच ली फोर्टिस यांची सांगण्याची भाषा चांगली नव्हती. त्यामुळे गौतम गंभीर संतापले, अशी माहिती सीतांशू कोटक यांनी दिली.

नेमका संवाद काय?, गौतम गंभीर ली फोर्टिस यांना काय म्हणाला?, VIDEO

टीम इंडियाचा सराव सुरु असताना गौतम गंभीर आणि ली फोर्टिस यांच्यात वाद झाला. यावेळी ली फोर्टिस नेमकं काय बोलताय, हे कळून येत नाहीय. परंतु गौतम गंभीर त्याला काय काय म्हणाला, याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे.
तुम्ही थांबा, आम्हाला काय करायचं ते तुम्ही सांगू नका..तुम्हाला सांगायची गरज नाहीय, असं गौतम गंभीर ली फोर्टिस यांना म्हणाला. तसेच माझ्या संघाला काय करायचं ते तुम्ही बोलू नका…तुम्हाला आम्हाला सांगण्याचा अजिबात अधिकार नाहीय. तुम्ही फत्त एक ग्राऊंड्समन आहात. त्याहून अधिक काहीही नाही. तुम्ही जाऊन तुम्हाला कोणाला तक्रार करू शकता, पण काय करायचे ते तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही तुमच्या मर्यादेत रहा…, असं गौतम गंभीर ली फोर्टिस यांना म्हणाला.

संबंधित बातमी:

Jasprit Bumrah Ind vs Eng 5th Test: पाचव्या कसोटी सामन्यातून जसप्रीत बुमराह बाहेर; टीम इंडियाला धक्का, कोणाला संधी?, महत्वाची अपडेट

आणखी वाचा

Comments are closed.