विराट-रोहित सर्वोत्तम, पण…कसोटीतून निवृत्तीनंतर प्रशिक्षकाची मोठी प्रतिक्रिया

भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. तत्पूर्वीच भारतीय संघाचे दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे भारतीय संघाला मालिकेपूर्वीच मोठा धक्का बसला. त्यावर आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहित आणि विराटच्या निवृत्तीबाबत मौन सोडले आहे. त्यांनी सांगितले की निवृत्ती हा खेळाडूचा वैयक्तिक निर्णय आहे आणि तो सर्वांच्या निर्णयांचा आदर करतो. (Gautam Gambhir Statement On VIrat Kohli And Rohit Sharma)

न्यूज 18शी बोलताना गौतम गंभीर म्हणाले की, कारकिर्द कधी संपवायची याचा निर्णय खेळाडूवर अवलंबून असतो. ते म्हणाले, “मला वाटते की तुम्ही कधी खेळायला सुरुवात करता आणि कधी निवृत्ती घ्यायची असते, हा खेळाडूचा वैयक्तिक निर्णय असतो. प्रशिक्षक असो, निवडकर्ता असो किंवा इतर कोणीही असो, कोणालाही खेळाडूला निवृत्ती घेण्यास सांगण्याचा अधिकार नाही.”

रोहित शर्माने (7 मे) रोजी आणि विराट कोहलीने (12 मे) रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या दोन्ही दिग्गजांच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही कबूल केले की विराट-रोहितच्या जाण्याने युवा खेळाडूंना संधी मिळेल, परंतु दोघांचीही भरपाई करणे सोपे होणार नाही.

पुढे बोलताना गंभीर म्हणाले, “हो, ते कठीण असेल, परंतु निश्चितच लोक हात वर करतील. एखाद्याच्या जाण्याने असा खेळाडू येऊ शकतो जो देशासाठी काहीतरी खास करू शकतो.” गौतम गंभीरने चॅम्पियन्स ट्रॉफीचे उदाहरण देत म्हटले की जसप्रीत बुमराहशिवायही भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. गंभीरने हे सांगण्याचा प्रयत्न केला की भारतीय संघ वरिष्ठ खेळाडूंशिवायही पुढे जाऊ शकतो.

Comments are closed.