गंभीरला चाहत्यांनी मैदानात घेरलं; हाय..हायचे नारे; टीम इंडियाचे खेळाडू आले धावून, सिराजने जे के


चाहते गौतम गंभीर हे हे व्हिडिओ म्हणत आहेत: दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका हरल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका होतं आहे. गुवाहाटीच्या मैदानावर तर त्यांच्या सोबत असे काही घडले, ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नसेल. सामना संपल्यानंतर जेव्हा गंभीर मैदानावर आला, तेव्हा स्टँडमध्ये जमलेल्या प्रेक्षकांनी जोरात “गौतम गंभीर हाय-हाय” अशी घोषणाबाजी केली. स्वतःच्या देशात, स्वतःच्या लोकांकडून अशी प्रतिक्रिया मिळेल, हे गंभीरलाही अपेक्षित नव्हते.

गौतम गंभीर निशाण्यावर का?

गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकले आहेत. तरीदेखील त्याच्यावर सर्वाधिक टीका होतेय ती कसोटी क्रिकेटमधील दयनीय प्रदर्शनामुळे. गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला घरच्या मैदानावर दोन वेळा क्लीन स्वीप सहन करावा लागला. न्यूझीलंडने भारताला 3-0 ने हरवले. आता आफ्रिकेने 2-0 ने मालिका जिंकली. भारताने फक्त बांगलादेश आणि वेस्ट इंडीज यांसारख्या कमजोर संघांना कसोटीमध्ये हरवले. ऑस्ट्रेलियात मालिका गमावली, इंग्लंडमध्ये मालिका ड्रॉ झाली.

गुवाहाटीत प्रेक्षकांचा रोष, मोहम्मद सिराजने जिंकली मने

इतक्या मोठ्या पराभवानंतर गुवाहाटीच्या मैदानात वातावरण पेटले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रेक्षक गंभीरच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत होते. टीम इंडियाचे खेळाडू आणि स्टाफ येथे उपस्थित होता. गंभीरच्याविरोधातील गोंधळ पाहून मोहम्मद सिराजने प्रेक्षकांकडे पाहून तोंडावर बोट ठेवत त्यांना शांत राहण्याचे संकेत दिले. या जेस्चरने तो आपल्या प्रशिक्षकासोबत ठाम उभा आहे, हे सर्वांना जाणवले. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून सिराजचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गंभीरच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह, आता पुढे काय?

गंभीर यांच्याखाली भारताने आतापर्यंत 19 कसोटी खेळले 7 विजय, 10 पराभव, 2 ड्रॉ झाले. हा आकडा स्पष्ट दाखवतो की कसोटी फॉरमॅटमध्ये भारताची घसरलेली स्थिती मोठी चिंता आहे. घरच्या मैदानावर दोनदा क्लीन स्वीप होणे जनतेला अजिबात मान्य नाही. 2026 मधील श्रीलंकेविरुद्धची मालिका ही पुढील मोठी कसोटी असेल. त्याआधी टीम मॅनेजमेंटने ढासळणारी फलंदाजी, धार गमावलेली गोलंदाजी, आणि असंतुलित टीम कॉम्बिनेशन या तिन्ही गंभीर समस्यांवर काम करणे अत्यावश्यक आहे.

हे ही वाचा –

R Ashwin on Gautam Gambhir : ‘तो काय माझा पाहुणा…’ टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर चॅम्पियन खेळाडूने गंभीरचं नाव घेत जे सांगितलं, ते ऐकून चाहते चक्रावले

आणखी वाचा

Comments are closed.