गौतम गंभीर ‘तो’ व्हिडिओ पाहून भडकला, सगळे ट्विट डिलीट करायला सांगितले, नेमकं काय घडलं?
गौतम गार्बीर नवीनतम क्रेडिट व्हिडिओ एडी: भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर आपल्या गंभीर स्वभावासाठी ओळखला जातो. आता त्याचा याच स्वभावाचा एक नवा किस्सा समोर आला आहे. एका नव्या CRED जाहिरातीमध्ये गंभीरचा रागीट अंदाज दाखवण्यात आला आहे. या प्रमोशनल व्हिडिओत गंभीरला क्रिएटिव्ह टीमने दाखवलेला AI प्रमो अजिबात आवडला नाही. संतापाच्या भरात तो सरळ बॅटने लॅपटॉप फोडताना दिसतो. गंभीरने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ही फाईल ताबडतोब डिलीट करा!” सोशल मीडियावर आता तो व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
ही फाईल त्वरित हटवा !! @क्रेड_क्लब pic.twitter.com/ftcvfh4jo6
– गौतम गार्बीर (@गौतमग्ंबीर) 19 सप्टेंबर, 2025
गौतम गंभीर ‘तो’ व्हिडिओ पाहून भडकला, नेमकं काय घडलं?
क्रेडिट आपल्या हटके आणि मजेशीर जाहिरातींसाठी ओळखला जातो. यावेळी कंपनीने लक्ष AI वर केंद्रित केलं. या जाहिरातीत तंत्रज्ञान कधी कधी कसं बिनसलं जाऊ शकतं हे दाखवण्यासाठी विचित्र आणि मजेदार गोष्टी AI ने तयार केल्याचं दाखवलं आहे. एका सीनमध्ये गौतम गंभीर (Gautam Gambhir) AI-जनरेटेड व्हिडिओमध्ये दिसतो. तो प्रेक्षकांना सांगतो की क्रेडिटवर क्रेडिट कार्ड बिलं भरून स्विगी इन्स्टामार्ट (Swiggy Instamart) कडून आईस्क्रीम जिंकू शकता. पुढच्या क्षणी व्हिडिओ अजून विचित्र होतो. नंतरचा सीन वास्तवात शिफ्ट होतो. खरा गौतम गंभीर आपल्या लॅपटॉपवर हा AI व्हिडिओ पाहताना दाखवला आहे. जेव्हा त्याला मत विचारलं जातं, तेव्हा तो आपल्या क्रिकेट बॅटने लॅपटॉप फोडतो.
ही पहिली वेळ नाही की क्रेडिट जाहिरातींसाठी व्हायरल होत आहे. यापूर्वी राहुल द्रविडच्या ट्रॅफिकमध्ये अचानक संतापलेल्या जाहिरातीने मोठं लक्ष वेधलं होतं. गौतम गंभीर सोबत ब्रँडने हाच फॉर्म्युला वापरला, एक अशी जाहिरात जी मजेदार आहे, शेअर करण्यासारखी आहे आणि चर्चा होण्यासारखी आहे.
मी आता सर्व जाहिरातींसाठी क्रिकेट बॅट ठेवतो 😡 pic.twitter.com/87J8OX0BVH
– गौतम गार्बीर (@गौतमग्ंबीर) 14 सप्टेंबर, 2025
टीम इंडिया आशिया कप 2025 च्या सुपर-4…
दरम्यान, गंभीर सध्या टीम इंडियासोबत आशिया कप 2025 साठी यूएईमध्ये आहे. आज (19 सप्टेंबर) भारत आणि ओमान यांच्यात अबू धाबीमध्ये ग्रुप टप्प्यातील शेवटचा सामना होणार आहे. मात्र, या सामन्याला विशेष महत्त्व राहिलेले नाही. कारण सुपर-4 फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत, ग्रुप ‘ए’ मधून भारत आणि पाकिस्तान आणि ग्रुप ‘बी’ मधून श्रीलंका आणि बांग्लादेश सुपर-4 साठी पात्र ठरले आहे. आशिया कपमध्ये भारताचा पुढचा टप्पा सुपर-4 असेल, पण त्याआधी गंभीरचा हा व्हिडिओ क्रिकेटसोबतच जाहिरातविश्वातही चर्चेत आला आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.