अर्शदीप सिंग अन् कुलदीप यादवला सतत प्लेइंग इलेव्हनमधून का वगळले जातेय?; गौतम गंभीर म्हणाला…


अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादववर गौतम गंभीर: अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हे भारतीय क्रिकेट संघातील दोन सामना जिंकणारे गोलंदाज आहेत. अर्शदीप हा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. दरम्यान, कुलदीपची फिरकी जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही मालिकांमध्ये अर्शदीप आणि कुलदीप दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि संपूर्ण संघ व्यवस्थापनावर यावर जोरदार टीका होत आहे. आता, गौतम गंभीरने स्वतः  या टीकेवर मौन सोडले आहे.

बीसीसीआय टीव्हीशी बोलताना गौतम गंभीर म्हणाले, प्रशिक्षक म्हणून हे कदाचित माझ्यासाठी सर्वात कठीण काम आहे. मला माहित आहे की बेंचवर अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत आणि प्रत्येकजण प्लेइंग इलेव्हनचा भाग होण्यास पात्र आहे, परंतु शेवटी, तुम्ही फक्त 11 खेळाडू निवडू शकता. तुम्हाला दिवस आणि परिस्थितीनुसार सर्वोत्तम संघाचे संयोजन तयार करावे लागेल, असं गौतम गंभीरने सांगितले.

सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर लक्ष- गौतम गंभीर (Gautam Gambhir Team India)

गौतम गंभीर असेही म्हणाला की, ड्रेसिंग रूममध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर माझं नेहमीच लक्ष असते. सकारात्मक वातावरण राखण्यासाठी त्याच्या खेळाडूंशी संबंध राखणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत मला माहिती आहे, असं गंभीरने सांगितले. जर तुम्ही प्रामाणिक, सरळ असाल आणि तुमचे शब्द मनापासून बोलले असतील तर त्यापेक्षा चांगले काहीही नाही. मला वाटते की आमचे खेळाडू देखील हे समजून घेतात. खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा आहे, असं गंभीरने स्पष्ट केले.

संबंधित बातमी:

IPL Trade News 2026 : आयपीएलमधील सर्वात खतरनाक एक्सचेंज, मुंबईचा राजा रोहित शर्मा हैदराबादमध्ये जाणार अन् ट्रॅव्हिस हेड येणार?

आणखी वाचा

Comments are closed.