मीच तो ज्याच्या मार्गदर्शनात आशिया कप अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली म्हणणाऱ्या गंभीरचा रिपोर्ट क


गौतम गंभीर रिपोर्ट कार्ड बातम्या : गौतम गंभीर सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि त्याच्या कामगिरीबद्दल देशभरात चर्चा होत आहे. मोठा प्रश्न असा गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून किती प्रभावी राहिला आहेत? याचं उत्तर त्याच्या आकडेवारीत स्पष्ट दिसतं. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली,आशिया कप पटकावला, तर इंग्लंडमध्ये कठीण कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. पण घरी खेळताना भारतीय संघाची स्थिती चिंताजनक राहिली. इतकंच नव्हे तर त्याचा घरचा कसोची रेकॉर्ड ग्रेग चॅपलपेक्षाही खराब आहे. चॅपल हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत विवादित प्रशिक्षक मानला जातो.

गंभीर कोच झाल्यापासून भारताची कामगिरी

  • झिम्बाब्वेविरुद्ध T20 मालिका : 4-1 विजय
  • श्रीलंकेत T20 मालिका : 3-0 विजय
  • श्रीलंकेत ODI मालिका : 0-2 पराभव
  • बांगलादेश (घर) – 2 कसोटी मालिका : 2-0 विजय
  • बांगलादेश (घर) – 3 T20 मालिका : 3-0 विजय
  • न्यूझीलंड (घर) – 3 कसोटी मालिका : 0-3 पराभव
  • दक्षिण आफ्रिका (बाहेर) – 4 T20 मालिका : 3-1 विजय
  • ऑस्ट्रेलिया (बाहेर) – बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : 1-3 पराभव
  • इंग्लंड (घर) – 5 T20 मालिका : 4-1 विजय
  • इंग्लंड (घर) – 3 ODI मालिका : 3-0 विजय
  • चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 – विजेते
  • इंग्लंड (बाहेर) – 4 कसोटी मालिका : 2-2 बरोबरी
  • आशिया कप 2025 – विजेते
  • वेस्ट इंडीज (घर) – 2 टेस्ट मालिका : 2-0 विजय
  • ऑस्ट्रेलिया (बाहेर) – 3 ODI मालिका : 1-2 पराभव
  • ऑस्ट्रेलिया (बाहेर) – 5 T20 मालिका : 2-1 विजय
  • दक्षिण आफ्रिका (घर) – 2 कसोटी मालिका : 0-2 पराभव

कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा घसरलेला ग्राफ

गौतम गंभीरच्या कार्यकाळात व्हाइट-बॉल क्रिकेटमध्ये भारताने चमकदार यश मिळवलं; पण कसोटी क्रिकेटची स्थिती खालावली आहे. बांगलादेश आणि वेस्ट इंडीजसारख्या कमजोर संघांवर घरी विजय मिळाला, पण न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या संघांकडून घरच्या मैदानावरच पराभव पत्करावे लागले. 2000 नंतर घरच्या कसोटी कामगिरीत गंभीर सर्वात कमकुवत ठरला.

घरच्या मैदानावर वाईट कसोटी रेकॉर्ड गंभीच्या नावावर

गेल्या 24 वर्षांत भारतीय संघाचे 8 हेड कोच झाले. त्यापैकी घरच्या मैदानावरचा सर्वात वाईट कसोटी रेकॉर्ड गंभीच्या नावावर आहे. घरच्या मैदानावर खेळलेल्या गेलेल्या 9 कसोटीत फक्त 4 जिंकले, ते पण बांगलादेश व वेस्टइंडीजविरुद्ध. आणि 5 मध्ये पराभव झाला. घरच्या मैदानावरील पराभव टक्केवारी 52.6% आहे. ग्रेग चॅपलच्या काळात भारताने फक्त 22.2% घरच्या मैदानावरील कसोटी गमावल्या होत्या. त्यामुळे गंभीरची टक्केवारी चॅपलपेक्षाही वाईट आहे.

कसोटी कोच पदावरून हटवण्याची मागणी

या आकडेवारीनंतर सोशल मीडियावर गंभीरला कसोटी क्रिकेटच्या प्रशिक्षकपदावरून हटवण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. अनेक माजी खेळाडू आणि विश्लेषक देखील म्हणत आहेत की भारताला कसोटी साठी स्वतंत्र, अनुभवी कोचची गरज आहे. गुवाहाटी कसोटी पराभवानंतर तर स्टेडियममध्ये फॅन्सनी “गंभीर हाय-हाय”चे घोष देत नाराजी स्पष्ट दाखवली.

हे ही वाचा –

Mohammed Siraj News : गुवाहाटी एअरपोर्टवर ड्रामा! मोहम्मद सिराज 4 तास अडकला, Air India वर काढला राग, रात्री नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.