शुबमन गिलबद्दल प्रशिक्षक गौतम गंभीर यांचं आश्चर्यचकित करणारं विधान! जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?
आयपीएल दरम्यान विराट कोहली (Virat Kohli & Rohit Sharma) आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे भारतीय निवडकर्त्यांनी शुबमन गिलला (Shubman gill) आपला नवीन कर्णधार बनवले.
गिलने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये (Anderson-Tendulkar Trophy 2025) उत्कृष्ट फलंदाजी केली. यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं होतं. आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी युवा भारतीय कर्णधार शुबमन गिलबाबत (Shubman gill) एक अत्यंत आश्चर्यचकित करणार विधान केले आहे.
शुबमन गिलबाबत गौतम गंभीर म्हणाले, (Gautam Gambhir on gill) दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्टार स्पोर्ट्सच्या मुलाखतीत गिलबाबत बोलताना सांगितले, मला आठवते जेव्हा मी त्याच्याशी बोललो, एक 25 वर्षांचा मुलगा कर्णधार बनला. मी त्याला सांगितले, मी तुला समुद्रात फेकतोय, आता किंवा तर तू बुडशील किंवा सर्वोत्तम पोहणारा बनून बाहेर येशील. इंग्लंड दौऱ्यावर फक्त 25 वर्षांच्या वयात जो दबाव त्याने हाताळला, ते खूप अवघड दोन महिने होते. त्याची फलंदाजी मजबूत होती, आमच्या संघात अनुभव कमी होता तरीही गिलने ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केली.
भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. तरीही शुबमन गिलवर अनेकदा टीका होत आहे. याबाबत गौतम गंभीर म्हणाले, इंग्लंडची फलंदाजी किती ताकदवान होती आणि आमच्याकडे अनुभवाचा अभाव होता, तरी त्याने सर्वात कठीण परीक्षा पास केली. बदलांचा काळ संपला आहे आणि त्यासाठी आता परिस्थिती सोपी होईल. काही लोकांनी जी टीका केली, ती अन्यायकारक आहे. खेळाडूंची निवड क्षमता पाहून केली जाते. जर तुम्ही कोणत्याही खेळाडूपासून सतत 50+ ची सरासरीची अपेक्षा ठेवल्यास, त्यास साध्य होण्यासाठी वेळ लागतो.
Comments are closed.