‘कोणत्याही व्यक्तीने गिलला कसोटी किंवा वनडे कर्णधार बनवून कोणतेही उपकार..’, नेमकं काय म्हणाले गौतम गंभीर?
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये भारताच्या विजयानंतर हेड कोच गौतम गंभीर यांनी शुभमन गिलबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. गंभीर यांनी गिलचे कौतुक करत सांगितले की, त्याने इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून आपली सर्वात कठीण परीक्षा पार केली आहे आणि कोणत्याही व्यक्तीने त्याला कसोटी किंवा वनडे कर्णधार बनवून कोणतेही उपकार केलेले नाही.
शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीने सोडवली होती, तर आता त्यांनी वेस्ट इंडीजला दोन्ही सामन्यात हरवले आहे. गिलला आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी वनडे संघाचे कर्णधारही बनवले गेले आहे, ज्याची सुरुवात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात होईल.
गंभीर यांना विचारले गेले की, मुख्य प्रशिक्षक म्हणून ते नवीन कर्णधार गिलला कसे सांभाळतात, तेव्हा त्यांनी सांगितले, त्याला आपला नैसर्गिक दृष्टिकोन कायम ठेवण्याची परवानगी देऊन. मला वाटते की, त्याला कसोटी किंवा वनडे कर्णधार बनवून कोणत्याही व्यक्तीने त्याच्यावर कोणतेही उपकार केलेले नाही. मला वाटते की, तो त्यास पात्र आहे. माझा विश्वास आहे की, त्याने खूप मेहनत केली आहे. कर्णधार म्हणून इंग्लंड दौऱ्यात त्याने आधीच सर्वात कठीण परीक्षा पार केली आहे.
इंग्लंडचा दौरा खरोखरच फार कठीण होता, कारण आपला सामना परदेशी परिस्थितीत एका मजबूत संघाशी होता. गिलने पुढे येऊन नेतृत्व केले आणि खेळाडूंमध्ये सन्मान मिळवला.
Comments are closed.