वारंवार फेल तरीही गौतम गंभीरचं हर्षित राणावरचं प्रेम कमी होईना, मोहम्मद शामीला पुन्हा डावललं, ट
हर्षित राणा आणि मोहम्मद शमी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) नुकताच भारतीय संघ जाहीर करण्यात आला होता. या संघ निवडीनंतर दोन मोठे धक्के भारतीय क्रिकेटप्रेमींना बसले होते. पहिला धक्का म्हणजे एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन रोहित शर्माची (Rohit Sharma) उचलबांगडी करुन शुभमन गिल याच्या हातात नेतृत्त्वाची धुरा सोपवण्यात आली होती. दुसरा धक्का म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी (Mohmmad Shami)) याच्याऐवजी हर्षित राणा (Harshit Rana) याला संधी देण्यात आली. हर्षित राणा याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 दोन्ही संघांमध्ये स्थान मिळाले आहे. यावरुन टीम इंडियाची निवड समिती आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर बरीच टीका केली जात आहे.
नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत हर्षित राणा याची कामगिरी अत्यंत सुमार झाली होती. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात बुमराहला विश्रांती देऊन हर्षित राणाला मैदानात उतरवले होते. मात्र, हर्षित राणाला श्रीलंकन फलंदाजांनी चोपले होते. शेवटच्या षटकात केवळ नशीबाची साथ मिळाली म्हणून हा सामना ड्रॉ झाला होता. यानंतर हर्षित राणाला संघात घेण्यावरुन प्रचंड टीकाही झाली होती. भारताचे माजी फलंदाज श्रीकांत यांनी हर्षित राणा आणि नितीशकुमार रेड्डी यांच्यासारख्या खेळाडूंना घेऊन 2027 च्या विश्वचषकाची संघबांधणी होत असेल तर भारताने जिंकण्याच्या आशा सोडाव्यात, असे उद्गार काढले होते. यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यानेही हर्षित राणाच्या निवडीवरुन सिलेक्शन कमिटीवर टीकास्त्र सोडले आहे.
मोहम्मद शामी याच्याऐवजी हर्षित राणाची निवड ही अत्यंत अयोग्य आहे. यापुढे निवड समितीच्या बैठकीचं थेट प्रक्षेपण झाले पाहिजे, असे मनोज तिवारीने म्हटले. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मोहम्मद शामीला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. तर दुसरीकडे हर्षित राणा याला अनेकदा संधी देऊनही त्याची कामगिरी सुमार राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर मनोज तिवारीने निवड समिती आणि प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यावर टीका करताना म्हटले की, मी या मुद्द्यावर जास्त बोललो तर वाद निर्माण होईल. हर्षित राणाने अनेक सामन्यांमध्ये जास्त धावा दिल्या आहेत. निवडकर्त्यांनी यावर लाईव्ह मिटींगमध्ये उत्तर द्यायला हवे. हर्षित राणाच्या निवडीबाबत अनेकजण चर्चा करत आहेत. हर्षित राणा आणि मोहम्मद शामी यांच्यापैकी चांगला गोलंदाज कोण आहे, यासाठी एक सर्व्हे घ्यावा. बहुतांश लोक मोहम्मद शामी हाच चांगला गोलंदाज असल्याचे सांगतील, असे मनोज तिवारी याने म्हटले.
Gautam Gambhir: गौतम गंभीरकडून हर्षित राणाला झुकते माप
गौतम गंभीरकडून हर्षित राणाला आतापर्यंत अनेकदा झुकते माप देण्यात आले आहे. मोहम्मद शामी याच्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे? मला याचे कारण जाणून घ्यायचे आहे. आशा आहे, याचे कारण लवकर समोर येईल. मी यावर अधिक बोलू इच्छित नाही, कारण त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटेल. हर्षित राणा हा एक प्रतिभावान खेळाडू आहे, यामध्ये शंका नाही. मात्र, आतापर्यंतची कामगिरी पाहता तो महागडा गोलंदाज ठरत आहे. तरीही हर्षित राणाला मोहम्मद शामीच्या तुलनेत झुकते माप दिले जात आहे. याचे उत्तर भारतीय संघाचे प्रशिक्षकच देऊ शकतात. हर्षित राणाने भारतीय संघाकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत दोन कसोटी सामने, पाच एकदिवसीय सामने आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळले आहेत. या प्रकारात हर्षितने अनुक्रमे 4,10 आणि 5 बळी मिळवले आहेत. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये हर्षित राणाचा इकॉनॉमी रेट 10 पेक्षा जास्त आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.