Independence Day 2025: 'माझा देश, माझी ओळख…'; स्वातंत्र्यदिनानिमित्त गौतम गंभीरकडून खास शुभेच्छा
भारतभरात आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात तिरंगा फडकवत नागरिक स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानांचा सन्मान करत आहेत. या राष्ट्रीय सोहळ्यात क्रीडा क्षेत्रातील दिग्गजही सहभागी होत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही या विशेष दिवशी देशवासियांना शुभेच्छा देत आपला देशभक्तीचा संदेश दिला.
गंभीर यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक खास फोटो शेअर केली, ज्यामध्ये ते तिरंग्याच्या पार्श्वभूमीवर दिसत आहेत. फोटोसोबत त्यांनी लिहिले,“माझा देश, माझी ओळख, माझं आयुष्य. जय हिंद”. त्यांच्या या छोट्याशा पण प्रभावी संदेशाला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, अनेकांनी त्यांच्या पोस्टवर देशभक्तीचे कमेंट्स केले. गंभीर यांचा हा संदेश क्रिकेट चाहत्यांसोबतच सर्वसामान्य भारतीयांच्या मनालाही भिडला.
माझा देश, माझी ओळख, माझे जीवन! जय हिंद! 🇮🇳#इंडेन्डेन्डेन pic.twitter.com/seiupwc8so
– गौतम गार्बीर (@गौतमग्ंबीर) 15 ऑगस्ट, 2025
माजी क्रिकेटपटू आणि सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले गौतम गंभीर नेहमीच आपल्या स्पष्ट मतांसाठी ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी अनेक महत्त्वाचे विजय मिळवून देणाऱ्या गंभीर यांनी याआधीही अनेकदा देशभक्तीची भावना व्यक्त केली आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी त्यांनी दिलेल्या या शुभेच्छा पुन्हा एकदा सिद्ध करतात की, त्यांच्या आयुष्यात क्रिकेटसोबत देशही तितकाच महत्त्वाचा आहे.
Comments are closed.