मालदीवमध्ये बोट उलटल्याने रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया जखमी, मित्र बेपत्ता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांच्या स्पीडबोटला मालदीवच्या समुद्रात भीषण अपघात झाला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेत सिंघानिया जखमी झाले असून, त्यांचे काही मित्र अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता असलेल्यांमध्ये प्रसिद्ध रॅली ड्रायव्हर हरी सिंग यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गौतम सिंघानिया आपल्या काही मित्रांसह मालदीवमधील व्ही फॅलिधू (V Felidhoo) भागात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. ७ प्रवासी (५ हिंदुस्थानी, १ ब्रिटीश आणि १ रशियन नागरिक) घेऊन जाणारी ही स्पीडबोट अचानक समुद्रात उलटली. या भीषण अपघातात बोट उलटल्याने सर्व प्रवासी समुद्रात फेकले गेले.

अपघातानंतर स्थानिक बचाव पथकाने गौतम सिंघानिया यांना तातडीने वाचवले. त्यांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र पुढील उपचारांसाठी त्यांना तातडीने एअरलिफ्ट करून मुंबईत आणण्यात आले आहे. सिंघानिया यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना किरकोळ दुखापत झाली असून मुंबईतील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स (MNDF) कडून मिळालेल्या माहितीनुसार, केंयोधू (Keyodhoo) बेटापासून काही अंतरावर ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे किंवा तांत्रिक कारणास्तव बोट उलटली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस आणि कोस्ट गार्ड अद्याप बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत.

Comments are closed.