गौतमी पाटीलच्या गाडीचा भीषण अपघात, रिक्षाचालकासह 3 जण गंभीर

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या गाडीचा भीषण पुणे मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ हा अपघात झाला. गौतमीच्या चालकाने मंगळवारी पहाटे 5 च्या सुमारास एका रिक्षाला जोरदार धडक दिली असून 3 जण जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

गौतमी पाटीलच्या चालकाकडून हा अपघात घडला आहे. अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत. गौतमीच्या गाडीच्या ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी ती गाडीत नव्हती. मात्र तिच्या चालकाकडून हा अपघात घडला आहे. पुणे येथील पुणे मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ हा अपघाच घडला आहे. यावेळी एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या रिक्षाला चालकाने मागून धडक दिली त्यात रिक्षाचालकासह दोन प्रवासी होते. ही धडक इतकी जबरदस्त होती की, यामध्ये रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर रिक्षाचालकासह दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गाडीचालक तिथेच असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Comments are closed.