जीडीपी वाढीचा दर वाढणार, रेपो रेट घटणार, आरबीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता, क्रिसिलचा अंदाज

<एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई : 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था तेजीनं विकसित होईल, असा अंदाज आहे. येत्या आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपी वाढीचा दर 6.5 टक्के राहील असा अंदाज आहे. याशिवाय मान्सून चांगला राहणार असल्याची शक्यता असल्यानं महागाईपासून दिलासा मिळण्याचा अंदाज असून खाद्यपदार्थांच्या किमती घटण्याची शक्यता आहे. 

क्रिसिलनं भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात एक रिपोर्ट जारी केला आहे. त्या रिपोर्टनुसार खासगी उत्पादनं अन् पुरवठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.  शेती उत्पादनांमध्ये वाढ झाल्यानं खाद्य पदार्थांच्या महागाईत घट होण्याचा अंदाज आहे. यामुळं मागणी आणि पुरवठ्यामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. खाद्य पदार्थांच्या बाबतीची महागाई कमी झाल्यानं लोकांकडे खर्चासाठी पैसे उपलब्ध राहतील. रिपोर्मध्ये सांगण्यात आलंय की 2025-26 मध्ये प्राप्तिकराची सूट 12 लाखांपर्यंत केल्यानं मागणी वाढेल. याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण जाहीर करताना मोठा निर्णय घेतला होता. पतधोरण जाहीर करताना आरबीआयनं रेपो रेट 6.25 टक्क्यांवर आणला होता. यामुळं बाजारात मागणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

आरबीआय आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये रेपो रेटमध्ये 50 ते 75 बेसिस पॉइंटमध्ये कपात करु शकते, अशी अपेक्षा क्रिसिलला आहे. अधिकृत आकड्यांचा हवाला देत क्रिसिलनं रिपोर्टमध्ये म्हटलं की, 2024-25  मध्ये जीडीपीच्या वाढीचा दर 6.5 टक्के राहील असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या जीडीपीचा विकास दर 9.2 टक्क्यां पेक्षा कमी आहे. विदास दर आर्थिक वर्ष 2011 आणि 2020 मध्ये  करोना महामारी पूर्वी दशकाची सरासरी 6.6 टक्के राहिली आहे.  भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा कायम राखण्यास याची मदत होऊ शकते.  

चालू आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे. यामुळं चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर 6.5 टक्के होईल. चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीतील जीडीपीचा वाढीचा दर 6.2 टक्के आहे. जो दुसऱ्या तिमाहीच्या जीडीपी वाढीच्या दराच्या 5.6 टक्के पेक्षा अधिक आहे.

इतर बातम्या : 

<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/business/gold-rate-today-gold- आणि-silver-pice-hike-on- 3-March-3-March-2025-Marathi-news-1347199">सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ, चांदी देखील महागली MCX वर सोन्याचे दर कुठंपर्यंत पोहोचले?

Ladki Bahin : कोट्यवधी लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, फेब्रुवारीचे 1500 अन् मार्चचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी सगळं सांगितलं

 
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Comments are closed.