डिजिटल निर्मात्यांसाठी 'जेम्स ऑफ इंडिया' चॅलेंज फीडबॅक पाठवा
माहिती-प्रसारण मंत्रालयाचा पुढाकार : ऑरेंज इकोनॉमीला वेग देण्याची तयारी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
2026-27 च्या अर्थसंकल्पात ऑरेंज इकोनॉमी म्हणजेच क्रिएटिव्ह इकोनॉमीला प्रोत्साहन देण्यावर खास जोर देण्यात आला आहे. याच दिशेने माहिती-प्रसारण मंत्रालयाने ‘जेम्स ऑफ इंडिया“ चॅलेंज सुरू पेले आहे. याचा उद्देश देशभरातील डिजिटल क्रिएटरची ओळख पटवत त्यांना त्यांची प्रतिभा दाखविण्याचे व्यासपीठ उपलब्ध करणे आणि भारताच्या क्रिएटिव्ह इकोसिस्टीमला मजबूत करणे आहे.
हा पुढाकार माहिती-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून सुरु करण्यात आलेलया ‘वेव्हज ओटीटी“ अंतर्गत मायवेव्हज सिटिजन क्रिएटर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. याच्या माध्यमातून लोक मूलभूत विषयांवर डिजिटल कंटेंट तयार करत त्याला अपलोड अन् शेअर करू शकतील. भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात अशा कहाण्या आहेत, ज्या जगापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे असे माहिती-प्रसारण मंत्रालयाचे मानणे आहे.
कहाण्या जगापर्यंत पोहोचविण्याची संधी
‘जेम्स ऑफ इंडिया“ देशाच्या रचनाकारांना स्वत:च्या कहाण्या जगापर्यंत पोहोचविण्याची संधी देणार आहे. या चॅलेंजमध्ये भाग घेण्यासाठी क्रिएटर मायवेव्हज सेक्शनद्वारे 1-3 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करू शकतात. प्रायोगिक टप्प्यासाठी अर्ज 1-31 ऑगस्टपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. प्रारंभ अंदमान आणि निकोबार, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादरा नगर-हवेली, दमण-दीव, गोवा आणि लडाखमधून होणार आहे. पुढाकारात युट्यूब आणि मेटा देखील स्वत:च्या क्रिटएर नेटवर्कद्वारे भागीदारी करणार आहे. तर या पुढाकाराचा विस्तार सर्व राज्यांपर्यंत करण्यात येणार असल्याचे माहिती-प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी सांगितले आहे.
वेगाने वाढतेय क्षेत्र
भारताचे अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) सेक्टर वेगाने वाढत आहे. 2030 पर्यंत या क्षेत्रात 20 लाखाहून अधिक प्रोफेशनल्सची आवश्यकता भासणार असल्याचा अनुमान आहे. या पुढाकाराद्वारे कला, संस्कृती, डिझाइन, मीडिया, डिजिटल कंटेंट, गेमिंग, फॅशन, संगीत आणि पर्यटन यासारख्या क्षेत्रांनाही चालना मिळणार आहे.
Comments are closed.