पुन्हा हिटलर नको, जर्मनीत हजारो नागरिक रस्त्यावर; नाझी कट्टरतावादाला विरोध

जर्मनीमध्ये धुर-दक्षिणपंथी पार्टी एएफडीच्या नव्या युथ विंग जनरेशन जर्मनीच्या विरोधात हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले.

एएफडीने जुंगे अल्टरनेटीव्ह जुनी यूथ विंग भंग करण्यात आली होती. जर्मनीच्या गुप्तचर खात्याने ही यूथ विंग कट्टरपंथी असल्याचे जाहीर केले होते. या विंगवर वर्णद्वेषी आणि नाझी विचारधारा असणाया गटांशी संबंध ठेवल्याचा आरोप होता. त्यामुळे नवी विंग स्थापन करण्यासाठी गीसन या शहरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सुमारे 25 हजार नागरिकांनी कार्यक्रमस्थळी निदर्शने केली. नाझी काळातील विचारधारा पुन्हा पसरण्याची भीती जर्मनीमध्ये निर्माण झाली आहे. हिटलरसारख्या विचारधारेला पुन्हा पसरू देणार नाही, अशी भूमिका निदर्शकांनी घेतली.

‘एएफडी’वर पूर्ण बंदी घालण्यास विरोध

जर्मनीच्या सुरक्षा दलांनीही ‘एएफडी’ला उजवे कट्टरवादी असल्याचे म्हटले होते. याविरोधात ‘एएफडी’ने न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचवेळी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्त्ज यांनी ‘एएफडी’वर पूर्णपणे बंदी घालण्याच्या भूमिकेला विरोधक केला आहे.

अॅडॉल्फ हिटलरचा सलग पाचव्यांदा विजय

नाव वाचून जरा आश्चर्य वाटेल. पण, हे खरे आहे. नामिबियामध्ये अॅडॉल्फ हिटलर युनोना यांनी सलग पाचव्यांदा निवडणुकीत विजय मिळविला आहे. युनोना हे सत्ताधारी ‘स्वॅपो’ पक्षाचे आमदार आहेत. त्यांच्या जागेवर फेरमतदान झाले. त्यात त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला. युनोना यांनी नुकतेच त्यांच्या नावातील हिटलर हे नाव वगळले आहे.

Comments are closed.