चालता हो! पत्रकाराच्या प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भडकले, पत्रकारावर घेतले तोंडसुख

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नावर संताप व्यक्त केला हाही मुद्दा आता खूप चर्चिला जात आहे. व्हाईट हाऊसमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी भेटीदरम्यान, एका पत्रकाराने त्यांना भविष्यात कतारच्या बोईंग- 747 चा एअर फोर्स वनमध्ये समावेश करण्याबद्दल प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताच ट्रम्प यांना राग अनावर झाला. ते त्या रिपोर्टरला म्हणाले, ताबडतोब येथून निघून जा, तू हे काम करण्यास पुरेसा हुशार नाहीस अशा शब्दात त्यांनी रिपोर्टरवर तोंडसुख घेतले.
व्हाईट हाऊसमध्ये दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी झालेल्या तणावपूर्ण भेटीदरम्यान ट्रम्प यांनी पत्रकारावर दक्षिण आफ्रिकेतील श्वेत शेतकऱ्यांवरील हिंसाचार आणि वर्णद्वेषी कायदे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित केल्याचा आरोपही केला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे की, एनबीसी आणि त्यांच्या मूळ कंपनीचे सीईओ आणि अध्यक्ष ब्रायन रॉबर्ट्स यांच्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे. तुमचे प्रश्न अपमानजनक आहेत. “तू कशाबद्दल बोलत आहेस?” पत्रकाराच्या प्रश्नाच्या उत्तर देताना ट्रम्प म्हणाले. तू कशाबद्दल बोलत आहेस? तुम्हाला माहिती आहे. तुला इथून निघून जावे लागेल. याचा कतारच्या जेटशी काय संबंध? ते युनायटेड स्टेट्स एअर फोर्सला एक जेट देत आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे.
आपण बऱ्याच इतर गोष्टींबद्दल बोलत आहोत आणि हे NBC त्या विषयापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे. जे तुम्ही आत्ताच पाहिले. तू खूप वाईट रिपोर्टर आहेस. पहिले म्हणजे, रिपोर्टर होण्यासाठी जे काही लागते ते तुमच्याकडे नाही. तू तेवढा हुशार नाहीस. ट्रम्प त्या रिपोर्टरला पुढे म्हणाले की, NBC मधील तुमच्या स्टुडिओमध्ये परत जावे, कारण ब्रायन रॉबर्ट्स आणि ते ठिकाण चालवणाऱ्या लोकांची चौकशी झाली पाहिजे. तुम्ही ते नेटवर्क ज्या पद्धतीने चालवता ते भयानक आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार, संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याचा हवाला देऊन, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी कतारकडून बोईंग-747 स्वीकारले होते. सुरक्षा आणि मोहिमेच्या तयारीसाठी व्यापक बदल केल्यानंतर, अध्यक्ष ट्रम्प वापरतील अशी अपेक्षा आहे. यापूर्वी, पेंटागॉनचे प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी विमानाच्या स्वीकृतीची पुष्टी केली होती. द हिलच्या मते, विमानाची किंमत अंदाजे 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे, जी कतारच्या राजघराण्याने अमेरिकेला भेट म्हणून दिली होती.
Comments are closed.