Ghatkopar Accident tempo crashed 5 to 6 people one died asj
मुंबई : कुर्ल्यामधील बेस्ट बस अपघाताची घटनेला अवघे काही दिवसच झाले असताना घाटकोपरमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. घाटकोपरच्या चिराग नगर परिसरात एका भरधाव टेम्पोने 5 ते 6 लोकांना चिरडल्याची घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, मार्केटमध्ये ही घटना घडली असून एका महिलेचा यामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई हादरली आहे. (Ghatkopar Accident tempo crashed 5 to 6 people one died)
हेही वाचा : Prakash Mahajan : प्रकाश महाजनांनी घेतला मोठा निर्णय, परवाना असलेले शस्त्र शासनाकडे करणार जमा; हे आहे कारण
– Advertisement –
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (27 डिसेंबर) संध्याकाळी घाटकोपर पश्चिमच्या चिराग नगर येथे एका भरधाव टेम्पोने 5 ते 6 जणांना उडवल्याची घटना समोर आली. या घटनेमध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर, यामध्ये 3 ते 4 जण जखमी झाले असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित नागरिकांनी टेम्पो चालकाला पकडले तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अंदाजे संध्याकाळी 7.15 च्या सुमारास हा अपघात झाला.
समोर आलेल्या माहितीनुसार, कोल्ड्रिंक्स घेऊन जाणारा टेम्पो हा नारायण नगर येथून भरधाव वेगाने येत होता. यावेळी टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि भाजी मार्केटमध्ये शिरला. यावेळी एक महिला गाडीखाली आली असतानाही चालक तिला दूरपर्यंत फरफटत घेऊन गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर त्याने आणखी काही जणांना धडक दिली. यामध्ये अंदाजे 3 ते 4 जण जखमी झाले असून घटनेनंतर तातडीने त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे 9 डिसेंबरला कुर्ल्यामध्ये घडलेल्या बेस्ट बस अपघाताच्या कटू आठवणी जाग्या झाल्या. या अपघातामध्ये 8 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, 48 जण यामध्ये जखमी झाले होते. यावेळी बेस्ट बस चालक संजय मोरे आणि वाहक या दोघांना अटक करण्यात आली होती.
Comments are closed.