IND vs AFG: गिल-ईशानची ऐतिहासिक कामगिरी; एकाच वनडेत 80 पेक्षा कमी चेंडूत शतके झळकावणारी पहिली भारतीय जोडी!
भारत आणि अफगाणिस्तान (Odi series between India vs Afghanistan) यांच्यात लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकांत 401 धावांचा डोंगर उभारला. टीम इंडियाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात कर्णधार शुबमन गिल (Shubman gill and Ishaan kishan) आणि ईशान किशन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, या दोघांनीही शतकी खेळी केली. गिल आणि ईशान या दोघांनीही 80 पेक्षा कमी चेंडूंमध्ये आपली शतके पूर्ण केली. या कामगिरीसह त्यांनी असा पराक्रम केला आहे, जो यापूर्वी एकाच वनडे सामन्यात दोन भारतीय खेळाडूंना कधीही जमला नव्हता.
शुबमन गिल आणि ईशान किशन यांनी ज्या वेगाने धावा केल्या, त्यासमोर अफगाणिस्तानचा कोणताही गोलंदाज त्यांना अडचणीत आणू शकला नाही. शुबमन गिलने या सामन्यात 77 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, तर ईशान किशनने वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक अवघ्या 71 चेंडूत साजरे केले. भारतीय वनडे क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे की, एकाच सामन्यात दोन खेळाडूंनी 80 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत शतके ठोकली आहेत. वनडे क्रिकेटच्या जागतिक इतिहासात अशी घटना घडण्याची ही केवळ आठवी वेळ आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात शुबमन गिल आणि ईशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 140 चेंडूंमध्ये 224 धावांची भागीदारी केली. अफगाणिस्तानविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी झालेली ही संयुक्तपणे दुसरी सर्वात मोठी भागीदारी आहे. तसेच, भारताच्या वनडे क्रिकेटमधील तिसऱ्या विकेटसाठीच्या सर्वात मोठ्या भागीदारींच्या यादीत ही भागीदारी चौथ्या क्रमांकावर आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध वनडेतील सर्वात मोठ्या भागीदारी!
डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – 260 धावा (2015, पर्थ)
हॅमिल्टन मसाकाद्झा आणि सिकंदर रझा (झिम्बाब्वे) – 224 धावा (2014, बुलावायो)
शुबमन गिल आणि ईशान किशन (भारत) – 224 धावा (2026, लखनऊ)
Comments are closed.