गुजरात टायटन्सचा महाविक्रम! गिल- सुदर्शनच्या जोडीने रचला इतिहास
दिल्लीच्या घरेलू मैदानात गुजरात टायटन्सच्या दोन फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये तुफानी फलंदाजी केली. त्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या फलंदाजीचा चाहता झाला आहे. सुदर्शनने 61 चेंडूत शतकी पारी खेळली. तसेच कर्णधार गिलने सुद्धा 53 चेंडूत नाबाद 93 धावा केल्या. गुजरातने दिल्लीच्या संघाला 10 विकेट्सने पराभूत करत आयपीएलच्या इतिहासात तो कारनामा केला आहे, जो याआधी कधीही घडला नव्हता.
दिल्ली कॅपिटल्सने 200 धावांच्या आव्हानासाठी साई सुदर्शन आणि शुबमन गिल या सलामीवीर जोडीने 19 षटकात हे आव्हान पूर्ण केलं. सुदर्शनने फलंदाजी करत 108 धावा केल्या, यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 4 षटकार झळकावले. तसेच कर्णधार गिलने 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 53 चेंडू 93 धावा केल्या.
आयपीएलच्या इतिहासात ही पहिली संधी आहे, जेव्हा कोणत्याही संघाने कोणतीही विकेट न गमावता 200 पेक्षा अधिक धावांचं आव्हान यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. या सोबतच आयपीएलमध्ये गुजरातने पहिल्यांदाच 10 विकेट्सने मोठ्या विजयाची चव चाखली आहे. यासोबतच गुजरात संघाचा ही दुसरी मोठी गाठलेली धावसंख्या आहे.
साई सुदर्शन आणि शुबमन गिल या जोडीने आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध सर्वात मोठी भागीदारी करण्याचा रेकॉर्ड सुद्धा त्यांच्या नावावर केला. यासोबतच गुजरातच्या या दोन फलंदाजांनी इंडियन प्रीमियर लीग इतिहासातील तिसरी सर्वात मोठी भागीदारी सुद्धा रचली आहे. भारतीय जोडी कडून आयपीएलच्या या हंगामात सर्वात जास्त धावा करण्याचा रेकॉर्ड सुद्धा गिल आणि सुदर्शनच्या नावावर नोंदवला गेला आहे. या जोडीने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत 859 धावा केल्या आहेत.
Comments are closed.