गिल टॉप फलंदाज, तर बुमराहपेक्षा जास्त विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आघाडीवर, पहिल्या दोन कसोटीनंतर भारताचे टॉप-5 खेळाडू
भारत आणि इंग्लंडची (IND vs ENG) कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू झाली होती. दोन कसोटी सामन्यांनंतर मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. लीड्स कसोटीमध्ये इंग्लंडने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. तर बर्मिंघममध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने जबरदस्त पलटवार करून 336 धावांनी मोठा विजय मिळवला. हा एजबेस्टन मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा पहिला विजय ठरला. आतापर्यंत काही भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. खाली अशा 5 भारतीय खेळाडूंची माहिती दिली आहे, ज्यांनी इंग्लंडविरुद्ध मालिकेत टॉप परफॉर्मन्स केला आहे.
शुबमन गिल – 500 च्या पलीकडे धावा करत कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) शानदार कामगिरी केली आहे. त्याने फक्त चार डावांतच 585 धावा केल्या आहेत, त्याची सरासरी 146 इतकी राहिलेली आहे. गिलने या मालिकेत आतापर्यंत 2 शतके आणि 1 द्विशतक ठोकले आहे. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. बर्मिंघम कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून त्याने एकूण 430 धावा केल्या.
आकाशदीप (Aakash Deep) मिळालेल्या संधीच सोनं करत त्याने चांगलीच कामगिरी केली. जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती देण्यात आली होती आणि त्याच्या जागी आकाशदीपला संघात घेतलं होतं. कुणी कल्पनाही केली नसेल की, हा खेळाडू भारताच्या विजयात इतका मोठा वाटा उचलेल. त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 4 विकेट्स आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेतल्या. आकाशदीप आतापर्यंत मालिकेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
रिषभ पंतची- रिषभ पंत भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार झाल्यावर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने 4 डावांत आतापर्यंत 85.50 च्या शानदार सरासरीने 342 धावा केल्या आहेत. या मालिकेत त्याने 2 शतके आणि 1 अर्धशतक ठोकले आहे. सर्वाधिक धावा बनवण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मोहम्मद सिराज- घातक गोलंदाजी करत पहिल्या सामन्यात फक्त 2 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजवर (Mohmmed Siraj) खूप टीका झाली होती. पण बर्मिंघम कसोटी सामन्यात त्याने जबरदस्त गोलंदाजी करत भारतीय आघाडीचं नेतृत्व केलं. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 6 विकेट्स घेतल्या आणि भारताला 180 धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. त्याने दोन्ही डाव मिळून 7 विकेट्स घेतल्या. आतापर्यंत त्याने एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत.
बुमराह – भारताचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता, पण पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 5 विकेट्स घेऊन भारताला मोठी आघाडी मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. पहिल्या डावात त्याने 5 विकेट्स घेतल्या होत्या.
Comments are closed.