आशिया कपपूर्वी शुबमन गिलसमोर मोठं आव्हान, बीसीसीआयने दिला 'हा' निर्देश!

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) सुरू होण्यापूर्वी शुबमन गिलची (Shubman gill) तब्येत बिघडली होती. त्यामुळे तो दुलीप ट्रॉफी 2025 मध्ये नॉर्थ झोनकडून खेळू शकला नाही. मात्र आशिया कप 2025 (Asia Cup) साठी गिलची भारतीय संघात निवड झाली आहे आणि त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे.

आशिया कपच्या तयारीपूर्वी बीसीसीआयने गिलला नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या ‘सेंट्रल ऑफ एक्सलन्स’मध्ये बोलावले आहे, जिथे त्याची फिटनेस टेस्ट होणार आहे. गिलसोबत रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांसारखे स्टार खेळाडूही फिटनेस चाचणीसाठी तिथे पोहोचले आहेत. मात्र रोहित शर्मा आशिया कप 2025 चा भाग नाही, कारण त्याने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पण जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) आशिया कपसाठी निवड करण्यात आली आहे.

नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA) मध्ये खेळाडूंच्या फिटनेस टेस्टसाठी ‘यो-यो टेस्ट’ आणि ‘डेक्सा टेस्ट’ घेतल्या जातात. या चाचण्यांमधून खेळाडूंची सहनशक्ती, वेग, ताकद आणि बॉडी फॅटचे प्रमाण तपासले जाते. बीसीसीआयच्या नियमांनुसार या चाचण्या पास करणे प्रत्येक खेळाडूसाठी बंधनकारक असते. त्यामुळे गिलसह बुमराहसारख्या खेळाडूंनाही आशिया कप 2025 आधी या चाचण्या द्याव्या लागणार आहेत.

Comments are closed.