आशिया कप संघामध्ये गिलची एन्ट्री! कोण जाणार संघाबाहेर?
आशिया कप 2025 सुरू होण्यासाठी आता फक्त काहीच दिवस उरले आहेत. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा देखील केली आहे. भारताच्या टी20 संघाची कमान सूर्यकुमार यादवच्या हातात देण्यात आली आहे, तर संघाचा नवा उपकर्णधार शुबमन गिलला बनवण्यात आला आहे. गिलचा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की जर गिल आशिया कपसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडला गेला, तर कोणत्या खेळाडूला संघाबाहेर बसावे लागू शकते?
शुबमन गिल तब्बल एक वर्षभर भारताच्या टी20 संघाबाहेर होता. मात्र, आयपीएल 2025 आणि इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेत केलेल्या दमदार खेळीनंतर गिलची भारताच्या टी20 संघात पुनरागमन झाले आहे. गिलने टीम इंडियासाठी शेवटचा टी20 सामना 30 जुलै 2024 रोजी खेळला होता. आता त्यानंतर तो आशिया कपमध्ये खेळताना दिसू शकतो.
टी20 वर्ल्ड कप 2024 संपल्यानंतर रोहित शर्माने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली. सूर्याने तरुण खेळाडूंना सोबत घेऊन संघाची उभारणी केली. संजू सॅमसन आणि रिंकू सिंह बराच काळ टीम इंडियाशी जोडलेले आहेत आणि आशिया कपसाठीदेखील त्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, जर आता शुबमन गिल प्लेइंग इलेव्हनचा भाग बनला, तर तो ओपनिंगसाठी मैदानात उतरेल हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
आशिया कपमध्ये जर शुबमन गिल ओपनिंगसाठी उतरला, तर संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागू शकते. पण जर संजूकडे मिडल ऑर्डरची जबाबदारी सोपवली गेली, तर रिंकू सिंहला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर रहावे लागू शकते.
Comments are closed.