शुबमन गिलची ऐतिहासिक कामगिरी! 148 वर्षांमध्ये असा कारनामा करणारा ठरला दुसरा खेळाडू

टीम इंडिया (Team india vs England) आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे पण, यजमान इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, तर असं वाटतं की, ही मालिका शुबमन गिल (Shubman gill) विरुद्ध इंग्लंड अशीच झाली आहे. बर्मिंघम कसोटीबद्दल तर हे शंभर टक्के खरं ठरेल. गिलने सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावातही शतक झळकावले आणि त्यानंतर रेकॉर्ड्सचा पाऊस पाडला.

त्याचबरोबर गिलने तो मेगा रेकॉर्ड देखील मोडला, जो जवळपास 148 वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) केला होता.
सर्वात आधी इतिहासात हा मेगा रेकॉर्ड विराट कोहलीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर केला होता.

शुबमन गिलने एका कसोटीत दोन्ही डावांमध्ये शतकं झळकावून कर्णधार म्हणून खास भारतीय खेळाडूंच्या यादीमध्ये स्थान मिळवलं आहे. पहिल्यांदा सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी ही कामगिरी केली होती. एकूण फक्त तीन भारतीय कर्णधारांनीच ही कामगिरी केली आहे.

सुनील गावस्कर – विंडीजविरुद्ध, कोलकाता (1987)

विराट कोहली – ऑस्ट्रेलियाविरुद्ध, अ‍ॅडिलेड (2014)

शुबमन गिल – इंग्लंडविरुद्ध, ऐजबस्टन (2025)

जर एका कसोटीत दोन्ही डावांमध्ये मिळून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, तर गिल कसोटी इतिहासातील पहिल्या 5 फलंदाजांमध्ये सामील झाला आहे. या यादीत गिल दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

तसेच कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास, या बाबतीतही गिल आता भारतीय फलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्यापुढे फक्त रोहित शर्मा 13 षटकारांसह आणि यशस्वी जयस्वाल 13 षटकारांसह आहे. गिलने बर्मिंघममध्ये 11 षटकार ठोकत या यादीमध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे.

Comments are closed.