“गिलसाठी असभ्य इशारा करणाऱ्या अबरारने विराटला म्हटले 'थँक यू'!”

अबरार अहमद भारत विरुद्ध सामन्यानंतर सोशल मीडियावर चर्चेत होता. पण तो त्याच्या गोलंदाजी मुळे नाही तर त्याने शुबमन गिलला बाद केल्यानंतर साजरा केलेल्या आनंदामुळे त्याच्यावर टीकांचा भडीमार होत आहे. तसेच पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी त्याच्यावर खूप टीका केल्या. आता अबरार अहमदने सोशल मीडियावर पोस्ट करून विराट कोहलीला धन्यवाद म्हटले आहे.

अबरार अहमदने त्याच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली आहे की, त्याने एका फोटोचा कोलाज शेअर केला आहे. त्यामध्ये भारतविरुद्ध पाकिस्तान सामन्यातील एक क्षण होता त्यामध्ये अबरार अहमद आणि विराट कोहली जवळ थांबले आहेत . तसेच एका फोटोत विराट कोहली अबरारच्या पाठीवर हात ठेऊन त्याच्या चांगल्या गोलंदाजीसाठी शाबासकी देत आहे. कोहलीच्या या व्यवहारासाठी अबरार अहमदने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली आहे.

अबरार ने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, माझ्या लहानपणीचा हिरो विराट कोहलीला गोलंदाजी केली. त्याने कौतुकाची थाप दिल्याबद्दल आभारी आहे. एका क्रिकेटरच्या रूपात त्याची महानता तसेच एका व्यक्तीच्या रूपात त्याची विनम्रता अगदी आदरपूर्वक आहे. विराट मैदानावर असो किंवा मैदानाच्या बाहेर, तो खरोखरच एक आदर्श आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत 23 फेब्रुवारी रोजी भारत पाकिस्तान सामना खेळण्यात आला होता. भारतीय संघाने पाकिस्तानला 6 विकेट्सने पराभूत केले. या पराभवाआधी पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानात न्यूझीलंडने 60 धावांनी पराभूत केले होते. ज्याकारणाने ते चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या बाहेर पडले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील 4 सेमीफायनललिस्ट संघ आता मिळाले आहेत. अ गटामधून भारत आणि न्यूझीलंड तर ब गटामधून ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका या संघांनी उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे.

हेही वाचा

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: इंग्लंडच्या निराशाजनक कामगिरीने संघ संकटात, नोंदवला नकोसा विक्रम

IND vs NZ: ‘या’ 3 कारणांमुळे केएल राहुलने न्यूझीलंडविरूद्ध सलामीला येऊ नये?

अफगाणिस्तान ICC ट्रॉफीपासून आता दूर नाही! महान गोलंदाजाची मोठी भविष्यवाणी, म्हणाला – पुढील…

Comments are closed.