अंश स्मॅशरने जीसीएल जिंकले

गिरगावच्या क्रिकेटप्रेमींसाठी मरीन लाइन्स येथील इस्लाम जिमखाना दोन दिवस अक्षरशः क्रिकेटच्या जल्लोषाने दुमदुमून गेले. युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ आणि गिरगाव बॉईज यांच्या पुढाकाराने आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीगच्या (जीसीएल) चौथ्या पर्वात अंश स्मॅशर संघाने मोरया इलेव्हनवर थरारक विजय मिळवत विजेतेपद पटकावले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्याने गिरगावकरांना क्रिकेटचा रोमांचकारी अनुभव दिला.

दक्षिण मुंबईचे माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या स्पर्धेचे आयोजन गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने केले जात आहे. यंदाच्या स्पर्धेचेही आयोजन त्यांच्या स्मरणार्थ करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई पोलीस आणि मुंबई वाहतूक पोलीस यांच्यात प्रेक्षणीय सामना रंगला. या सामन्यात मुंबई पोलीस संघाने बाजी मारत उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली.

या स्पर्धेला शिवसेना नेते आणि खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव सुधीर साळवी, उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, नगरसेविका संपदा मयेकर, नगरसेवक शशिकांत शिंदे, ‘दैनिक सामना’चे दीपक शिंदे, समन्वयक दिलीप सावंत आणि युवासेना निरीक्षक अलकेश म्हेत्री यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उपविभागप्रमुख कृष्णा पवळे, शाखाप्रमुख शशिकांत पवार, महेंद्र कांबळे, वैभव मयेकर, समन्वयक निलेश देवळेकर, अशोक मोरे, अभिजित देवरुखकर आणि अभिषेक साळवी यांच्या उपस्थितीत पार पडला. विजेत्या अंश स्मॅशर आणि उपविजेत्या मोरया इलेव्हन संघाला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱया खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला. उदयोन्मुख खेळाडू म्हणून यतीन हळदणकर, उत्कृष्ट फलंदाज प्रथम परमार, उत्कृष्ट गोलंदाज शुभम तळवडेकर, मालिकावीर अंकित मळेकर आणि उत्कृष्ट झेलसाठी सुयश माने यांना चषक आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसमर्थ पतपेढीचे मानद संस्थापक जनार्दन बोत्रे, संचालक हेमंत तुपे तसेच उद्योजक महेश पटेल यांचे विशेष सहकार्य लाभले. युवा व्हिजन आणि गिरगाव बॉईजचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मंदार ठाकूर, राकेश साळवी, मिलिंद झोरे, समीर मोरे, सिद्धेश धनावडे, अक्षय गवारे, वरुण खुळे, ओंकार माने आणि अनिकेत मेस्त्राr यांनी अथक परिश्रम घेत या स्पर्धेला यशस्वी केले.

Comments are closed.