नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमधील वाद शमेना, रक्षा खडसेंची डोकेदुखी वाढली
जळगाव:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मधे नुकतीच विधानपरिषदेत जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळाले होते. या घटनेनंतर मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी या दोन्ही नेत्यांच्या मधे आपण समेट घडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या मधे समेट होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने मंत्री रक्षा खडसे यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे.
मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे राजकीय विरोधी पक्षात असल्याने त्यांच्या मधे राजकीय विरोध असणे स्वाभाविक असले,तरी भाजपाकडून केंद्रात मंत्री पदावर असलेल्या मंत्री रक्षा खडसे यांच्या साठी मात्र या दोघा नेत्यांना सांभाळणे मोठे कठीण काम झाले आहे.
त्याला कारण एकनाथ खडसे हे त्यांचे सासरे आहेत,तर दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन हे त्यांच्या भाजपा पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत
दोघेही बडे नेते आहेत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप करताना टोकाचे शब्द वापरल्यानेरक्षा खडसे यांच्यापुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये आपण समेट घडवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचं मंत्री रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.
मात्र, एकनाथ खडसे हे बोलताना खालच्या पातळीवर जाऊन बोलत असल्याने आपला त्यांच्यावर राग आहे. रक्षा खडसे यांनी समेट घडविण्याची भाषा करताना आपल्या घरातून पाहिले प्रयत्न करावेत, असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटल्याने एकनाथ खडसे हे आता गिरीश महाजन यांच्यावर टीका करणे थांबवणार का आणि मंत्री रक्षा खडसे यांना यश मिळेल का हाच खरा प्रश्न आहे.
एकनाथ खडसे अन् माझी नार्को टेस्ट करा: गिरीश महाजन
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. यादरम्यान एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. एका मुली सोबत चाळे करणाऱ्या भाजप (BJP) नेत्याची नेत्याची क्लिप मी भाजपच्या वरिष्ठांना दाखवली होती. पण, नंतर माझ्या मोबाईलमधून ती क्लिप डिलीट झाली, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख गिरीश महाजन यांच्या दिशेने होता. त्यावर गिरीश महाजन यांनीही प्रत्युत्तर दिले होते. एकनाथ खडसे आणि माझी दोघांची नार्को टेस्ट करा. हे मी जबाबदारीने बोलत आहे. तुम्ही त्यांना विचारा सत्य काय आणि मला पण विचारा सत्य काय आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.