विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कोणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करु नका : महाजन
गिरीश महाजन: गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये सातत्याने इनकमिंग सुरु आहे. अनेक नेते पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पक्ष प्रवेशावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (गिरीश महाजन) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करू नका, असा सल्ला महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. जळगावच्या जामनेरमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मंत्री गिरीश महाजनांनी जळगावच्या जामनेरमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करु नका, असा सल्ला यावेळी महाजन यांनी दिला. गिरीष महाजन हे भाजपचे बड नेते समजले जातात. ते भाजपचे संकटोमचक म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी यापूर्वी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, अशातच आज त्यांनी विरोधकांना आपलसं करुन घ्यावे असे सल्ला दिला आहे. विरोधकांची तोडं बंद करा आणि त्या पक्षात घ्या असा सल्ला त्यांनी दिली आहे. त्यामुळं आगामी काळात नेमका कोणाचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
उद्धव ठाकरेंनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलं, डेड बॉडीमध्ये किती पैसे खाल्ले? महाजनांचा हल्लाबोल
आणखी वाचा
Comments are closed.