Girish Mahajan criticism of Sanjay Raut revelations on Narendra Modi and Amit Shah
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन होणार. पण या पुस्तकात लिहिण्यात आलेल्या काही आठवणींवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण या पुस्तकातून राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे शनिवारी (ता. 17 मे) प्रकाशन होणार आहे. पण त्याआधीच या पुस्तकातील बराचसा मजकूर समोर आला आहे. ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातील “राजा का संदेश साफ है” या प्रकरणात दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कशाप्रकारे मदत केली, याची आठवण लिहिली आहे. राऊतांनी त्यांच्या पुस्तकातून अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटावरून खळबळ उडाली आहे. पण याबाबत आता भाजपा नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. राऊतांनी लिहिलेल्या पुस्तकाला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे म्हणत महाजनांनी राऊतांना सुनावले आहे. (Girish Mahajan criticism of Sanjay Raut revelations on Narendra Modi and Amit Shah)
भाजपा नेते तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (ता. 16 मे) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानांबाबत आणि राऊतांच्या पुस्तकाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी उत्तर देताना महाजन म्हणाले की, संजय राऊत यांच्या बद्दल काय बोलावे? ते काय बोलतात आता ते कोणी ऐकत सुद्धा नाही. वाटेल तसे ते फालतू बडबड करत असतात. युद्ध सुरू असताना मोदींनी राजीनामा द्यावा, अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊत करत होते. सैनिकांबद्दल काहीही बोलत होते. मला वाटते आता या माणसाला कोणीच गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेले बरे असे मला वाटते, असे म्हणत महाजनांनी टीकास्त्र डागले.
हेही वाचा… Sanjay Raut : संजय राऊतांच्या रडावर अमित शहा, बाळासाहेब-पवारांच्या मदतीची करून दिली आठवण
तर, बाळासाहेबांनी मोदी आणि शहा यांना मदतीचा हात दिला असेल तर चांगलेच आहे. आम्ही आता खऱ्या शिवसेनेसोबत आहोत. आधी पण शिवसेनेसोबत होतो आणि आता सुद्धा खऱ्या शिवसेनेसोबत आहोत. आजही आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही आजही टिकवलेले आहेत. आम्ही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत. काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेल्या शिवसेनेसोबत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या शिवसेनेसोबत आम्ही नाही. पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. आज त्यांची परिस्थिती काय झाली आहे. त्यामुळे त्यांना रोज सकाळी अशी बडबड करावे लागते, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
संजय राऊत यांना किती महत्त्व द्यायचे आणि त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे आणि त्यांच्या लिहिण्याला किती महत्त्व द्यायचे हे पाहावे लागेल. आता त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यांचे कोणी ऐकत नाही. सकाळपासून त्यांचा भोंगा सुरू होतो. संपूर्ण देश हा मोदींच्या पाठीशी उभा असताना, सैन्याच्या पाठीशी उभा असताना त्यावेळी ते म्हणत होते मोदींनी राजीनामा द्यावा. आता आपण त्या अतिरेक्यांशी लढावे की देशांतर्गत असलेल्या या अतिरेक्यांशी लढावे? मला वाटते या पुस्तकाला आपण किती महत्त्व द्यावे. संजय राऊत कसा माणूस आहे सर्वांना माहीत आहे. त्या पुस्तकात त्यांनी काय लिहिले आहे मी वाचलेले नाही आणि वाचणारही नाही. मला वाटते त्याला फार महत्त्व देण्याची गरज सुद्धा नाही, असे सांगत गिरीश महाजनांनी खासदार राऊतांना सुनावले आहे.
Comments are closed.