मुलगी हरली की घोळ सून जिंकली की सर्व काही ठिक, मंत्री गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला


गिरीश महाजन: रक्षा खडसे (Raksha Khadse) निवडून आल्या तेव्हा मतदार याद्यांमध्ये घोळ होता का? असा सवाल करत  मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) टोला लगावला. मुलगी हरली तर घोळ सुन जिंकली तर सर्वकाही ठीक ही खडसेंची भुमिका आहे. मग याद्या खराब झाल्या का? असा सवालही महाजन यांनी खडसेंना केला. आपण लोकसभा जिंकलो तर बरोबर, हरलो तर चुकीचे, संधी पाहून विरोधकाचे विचार बदलता, अशी टीका महाजन यांनी विरोधकांवर केली.

मतदार याद्यांमधील घोळ हा विरोधकांचा कांगावा, रडीचा डाव

दोन डिसेंबरला नगरपालीका, नगरपंचायत निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्या जाहीर होणार होत्याच तसे सुतोवाच झालेच होते. आम्ही आणि महायुती या निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. यावेळी महायुतीच राज्यात निवडून येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मतदार याद्यांमधील घोळ हा विरोधकांचा कांगावा, रडीचा डाव आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊतं, राहुल गांधी यांचा हा डाव असल्याचे महाजन म्हणाले.

टोकाची भुमिका असेल तर मग तिथे मैत्रीपुर्ण लढू

आपण लोकसभा जिंकलो तर बरोबर, हरलो तर चुकीचे, संधी पाहून विरोधकाचे विचार बदलता, अशी टीका महाजन यांनी विरोधकांवर केली. विरोधकांनी पुन्हा एक नेरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा नेरेटीव्ह यशस्वी होणार नाही. आमची महायुती म्हणून लढण्याची भुमिका आहे. पण काही ठिकाणी टोकाची भुमिका असेल तर मग तिथे मैत्रीपुर्ण लढू असेही महाजन म्हणाले.

मतदार यांद्यामध्ये कुठेही घोळ नाही

मतदार यांद्यामध्ये कुठेही घोळ नाही. कुठे प्रिंटीग मिस्टींग, दोन वेळा नाव असेल असं होत असते. पण याद्यामध्ये एवढ्या त्रुटी नाहीत की देशातील चित्र बदलेल आणि फक्त भाजपाच निवडून येईल. मग चारशे पारचा नारा देवून आम्ही का मागे पडलो? पण आम्ही याद्यामध्ये घोळ असे म्हटले नाही. रडत बसायच का असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. हे सरकार ओबीसी विरोधी असं वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले होते. त्यांच्या विधानाचा देखील महाजनांनी समाचार घेतला. सर्व विरोधक सोईने अर्थ लावतात, कोणी म्हणत हे मराठे विरोधी, कोणी म्हणत हे ओबीसी विरोधी आहेत. विरोधकांना यातून काही नेरेटीव्ह सेट करायचे असल्याचे महाजन म्हणाले.

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी कसलाही इफेक्ट होणार नाही

येणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूकामध्ये आम्ही दोन तृतीयांश नगरपरिषदा जिंकू, दोनशेहून अधिक ठिकाणी जिंकून येण्याचा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. नंदुरबारच्या जलसिंचन प्रकल्पांच्या अनुशंगाने लवकरच आढावा बैठका घेणार आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी कसलाही इफेक्ट होणार नाही असे महाजन म्हणाले. दोन्ही बंधूंनी एकमेकांविरोधी विखारी टिका केली आहे. आता एकत्र यायचा आव, आम्हाला याबद्दल काही म्हणायच नाही असेही महाजन म्हणाले. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देवून शरद पवार, काँग्रेसच्या मांडीवर जावून बसले. हिरवा झेंडा हाती घेता शिवसेनेचे सर्व विचार विकून खाल्ल्याचे महाजन म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.