Girl Viral Video “सगळ्यांचे पप्पा आहेत तुम्ही मात्र दारुमुळे”… चिमुकलीचे हृदयात हात घालणारे बोल ऐकून नेटीझन्स गहिवरले

बऱ्याचदा सोशल मिडियावर असे अनेक व्हिडिओ आपल्यापर्यंत येतात जे पाहताच आपल्या डोळ्यातल्या अश्रूंवर किंवा आपल्या भावनांवर आपला ताबा राहत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधली लहान मुलगी आपल्या निधन झालेल्या वडिलांच्या फोटोसमोर उभे राहून अत्यंत भावूक होऊन बोलत असल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर  मनाला चटका लावून गेला आहे.

त्या लहान मुलीने आणि तिच्या वडिलांमधील हे छोटे संभाषण ऑनलाइन लोकांच्या मनाला भिडले, कारण त्यात तिने दारूच्या व्यसनाचे विनाशकारी परिणाम किती स्पष्टपणे मांडले आहेत.

व्हिडिओ खालील लिंकवर पाहा

https://www.instagram.com/reels/DZjcMtzoxGR/

@flix.indian या इन्स्टाग्राम अकाऊंटने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये , ती लहान मुलगी रागावलेली दिसत असली तरी, तिचे वडील इतक्या लवकर हे जग सोडून गेल्याबद्दल बोलताना तिच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत आहे.

आपले वडिल अजूनही आपल्यासमोरच उभे आहेत अशा भावनेने चिमुकली त्या  फोटोशी बोलताना म्हणाली की, इतर मुलांना वडील आहेत, पण तुमचा दारू पिऊन त्यांचा मृत्यू झाला. “आई तुम्हाला थांबवायची, बाबा. तुम्ही का प्यायचे? प्रत्येकाला वडील असतात, आणि तुम्ही आम्हाला सोडून गेलात,” ती म्हणाली.

नेटीजन्स भावूक

जरी या पोस्टमध्ये नावे किंवा ठिकाणांची माहिती दिलेली नसली आणि हा व्हिडिओ नेमका कधी शूट झाला हे  निश्चितपणे सांगता येत नसले तरी, या अनामिक व्हिडिओमुळे पाहणाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आले हे मात्र खरे.. ही क्लिप झटपट व्हायरल झाली आणि प्लॅटफॉर्मवरील हजारो युजर्सपर्यंत पोहोचली. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या स्वतःच्या वेदनादायक वास्तवाबद्दल आणि बालपणीच्या आघातांबद्दल मनमोकळेपणाने सांगितले.

Comments are closed.