'10 लाख द्या नाहीतर…', भोजपुरी स्टार रितेश पांडेला धमकी; गायकाकडून फोनवरून खंडणीची मागणी
रितेश पांडेला जिवे मारण्याची धमकी भोजपुरी इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. भोजपुरी सिनेमाचा अभिनेता आणि गायक रितेश पांडेला धमकी मिळाली आहे. गायकाकडून फोनवरून १० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. रितेश पांडे यांनी ही तक्रार पोलिसांत दिली आहे. पोलिसांनीही गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. रितेशने या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. या बातमीनंतर रितेश पांडेचे चाहतेही तणावात आहेत. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.
गायक यांनी तक्रार दाखल केली
रितेश पांडे याने सारनाथ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोजपुरी स्टार रतेश पांडेच्या अधिकृत फोन नंबरवर कॉल करून १० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांना माहिती देताना रितेश पांडे यांनी सांगितले की, फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव बुलबुल यादव असल्याचे सांगितले आहे. तसेच, तो सारनाथचा रहिवासी आहे. रितेशने पुढे सांगितले की, कॉल येताच या व्यक्तीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करण्यासोबतच या नराधमाने गायकाकडे 10 लाख रुपये मागितले आणि 10 लाख रुपये दे अन्यथा जीवे मारेन, असे सांगितले. त्याने स्वत:चे डॉन असे वर्णनही केले.
व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवली
रितेश पांडेच्या जबाबानंतरच पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. तर बुलबुल यादवची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलबुल यादव यांच्या विरोधात बीएनएस कलम 351(3), 352 आणि 308(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसही बुलबुल यादवच्या शोधात सर्वत्र तपास करत आहेत. लवकरच बुलबुल यादव पोलिसांच्या हाती लागणार आहे.
Comments are closed.