षटकार मारल्यानंतर 12 धावा मिळायला हव्या, इंग्लडच्या ‘या’ माजी खेळाडूची भन्नाट मागणी!
इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन (Kevin piterson) नेहमीच आपली थेट आणि बेधडक मते मांडताना दिसतो. वेळोवेळी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आणि खेळाडूंचीही टीका करतो. यावेळी पीटरसनने क्रिकेटमधील एक नियम बदलण्याची सूचना केली आहे. त्याचे मत आहे की जर एखाद्या फलंदाजाने मोठा छक्का मारला, तर त्याला 12 धावा द्यायला हव्यात. त्याचे हे विधान सध्या चर्चेत आले आहे.
सोशल मीडियावर लिहिताना पीटरसन म्हणाला, मी आधीही सांगितले आहे आणि पुन्हा सांगतो, जर एखाद्या फलंदाजाने 100 मीटरपेक्षा जास्त लांबीचा छक्का मारला, तर त्याच्या स्कोरमध्ये 12 धावा जोडायला हव्यात. जितके जास्त फलंदाज हे प्रयत्न करतील, तितका खेळ अधिक रोमांचक व मनोरंजक बनेल.
त्याचे मत आहे की 100 मीटरपेक्षा लांब छक्का मारणाऱ्या फलंदाजाला 6 नव्हे तर थेट 12 धावा मिळायला हव्यात. हे नियम बदलल्यास खेळ अजून रोचक बनेल, असे तो मानतो. पीटरसनच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींना त्याची ही कल्पना आवडली, तर काहींनी त्याची खिल्ली उडवली.
45 वर्षीय केविन पीटरसनने इंग्लंडसाठी 104 कसोटी सामन्यांत 47.28 च्या सरासरीने 8181 धावा केल्या आहेत. तसेच 136 एकदिवसीय सामन्यांत त्याने 40.73 च्या सरासरीने 4440 धावा केल्या. 37 टी-20 सामन्यांत त्याने 37.93 च्या सरासरीने 1176 धावा केल्या आहेत.
Comments are closed.