ग्लेन मॅक्सवेलचा मास्टर प्लॅन! यंदा बॅट नव्हे, बॉलने गाजवणार टी20 वर्ल्ड कप! म्हणाला, “मला विकेट्स…”

ग्लेन मॅक्सवेल: ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघात स्थान टिकवून ठेवण्यासाठी ग्लेन मॅक्सवेलला त्याच्या खराब फलंदाजीमुळे अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, मॅक्सवेलने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर संघातील आपले स्थान कायम राखले आहे. आता त्याने 2026 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या तयारीबद्दल एक मोठे विधान केले आहे. (Glenn Maxwell T20 World Cup 2026)

काय म्हणाला मॅक्सवेल?
ग्लेन मॅक्सवेलने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, “मला वाटते की उपखंडातील खेळपट्ट्यांवर सुरुवातीला फिरकीपटूंना विकेट्समधून थोडा अधिक फायदा मिळू शकतो. मला विकेट्स घेणे खूप आवडते, जेव्हाही मी एखाद्याला बाद करतो, तेव्हा मला आश्चर्य वाटते. मला पॉवरप्लेमध्ये आपली भूमिका बजावायची आहे आणि त्यासाठी मी अधिक चांगल्या प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे.” (Glenn Maxwell Statement)

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्लेन मॅक्सवेलने आतापर्यंत 123 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 28.86च्या सरासरीने 2,771 धावा केल्या आहेत, ज्यात 5 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, मॅक्सवेलने 29.73च्या सरासरीने 49 विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेट 8.17 राहिला आहे. एका सामन्यातील त्याची सर्वोत्तम कामगिरी 10 धावा देऊन 3 विकेट्स अशी आहे. (Maxwell’s performance in batting and bowling)

Comments are closed.