क्रिकेट ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅक्सवेलला सेंट्रल कॉन्ट्रक्टमधून वगळणार! सीएसके, आरसीबीचे स्टार खेळाडू ‘इन’

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधील निराशाजनक कामगिरीमुळे येत्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डमध्ये काही बदल दिसण्याची शक्यता आहे. यामध्ये संघाचा अनुभवी खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला मोठा धक्का बसू शकतो. क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२६-२७ हंगामासाठी वार्षिक केंद्रीय कराराची यादी जाहीर करणार आहे. त्यामध्ये अनेक मोठे बदल दिसणार आहेत.
यावर्षी कसोटी क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे, यामुळे अनेक व्हाईट बॉल खेळांडूना संघातून बाहेर पडावे लागू शकते आणि यामुळेच मॅक्सवेलचा केंद्रीय करार जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया नव्या हंगामासाठी मॅक्सवेलला केंद्रीय कराराच्या यादीतून वगळण्यास तयार आहे. या माहितीने खळबळ उडाली आहे, कारण तो मर्यादीत षटकांमधील ऑस्ट्रेलियाचा प्रमुख खेळाडू राहिला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया लवकरत नवीन कराराची यादी जाहीर करणार आहे. त्यामध्ये केवळ मोजक्याच मर्यादीत षटकांच्या खेळाडूंना करार मिळणार. ऑस्ट्रेलियाने २०२६ मध्ये अधिक लक्ष कसोटींमध्ये केंद्रित केले असून त्यासाठीच्या खेळाडूंना करारबद्ध करणार आहे. यामुळे अनेक टी२० आणि वनडे खेळाडू वार्षिक करारातून वगळले जाणार आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन यांच्यात झालेल्या ठरावानुसार २० ते २४ खेळाडूंना केंद्रीय करार देऊ शकते, परंतु यावर्षी ती यादी कमी करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती समोर येत आहे.
या यादीमध्ये मॅक्सवेलबरोबर मॅट शॉर्ट आणि सॅम कॉन्स्टास यांनाही करार मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. तसेच कॅमेरुन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस आणि नॅथन इलिस हे मात्र करारामध्ये कायम राहतील. पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श हे पण संघासाठी महत्वाचे आहेत.
आयपीएलमध्ये ग्रीन कोलकाता नाईट रायडर्स, हेझलवूड रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि इलिस चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे.
Comments are closed.