IPL 2025: पंजाब किंग्जला मोठा धक्का..! दिग्गज अष्टपैलू आयपीएल 2025 मधून बाहेर
आयपीएल 2025 मधील 49वा सामना आज (30 एप्रिल) चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर रंगला आहे. दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध पंजाब किग्ज हे संघ आमने-सामने आहेत. पण या सामन्यापूर्वीच पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आयपीएलच्या चालू हंगामातून बाहेर पडला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात टाॅस जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) ग्लेन मॅक्सवेलच्या बाहेर पडण्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. श्रेयस अय्यरने सांगितले की ग्लेन मॅक्सवेलला बोटाला दुखापत झाली आहे आणि त्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
आयपीएल 2025 मधून ग्लेन मॅक्सवेलचे बाहेर पडणे हा पंजाब किंग्जसाठी मोठा धक्का आहे. तो संघातील सर्वात महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होता. पण, या हंगामात ग्लेन मॅक्सवेलची बॅटच्या दम दाखवला नाही. तो फलंदाजीत सतत संघर्ष करताना दिसला परंतु गोलंदाजीत त्याने संघासाठी अनेक वेळा मोठ्या फलंदाजांना शिकार केले. मॅक्सवेलच्या बोटात फ्रॅक्चर आहे, ज्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर आहे. सध्या पंजाब किंग्जने ग्लेन मॅक्सवेलच्या जागी कोणत्याही खेळाडूची घोषणा केलेली नाही.
ग्लेन मॅक्सवेलच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, तो संपूर्ण हंगामात पंजाब किंग्जसाठी एकही अर्धशतक झळकावू शकला नाही. चालू हंगामात त्याची सर्वोच्च धावसंख्या 30 धावा होती. जी त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध केली. या डावाव्यतिरिक्त, मॅक्सवेलला एकाही सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. या हंगामात मॅक्सवेलच्या कामगिरीवर नजर टाकली तर, तो पंजाब किंग्जसाठी 7 सामन्यांमध्ये फक्त 48 धावा करू शकला.
यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्जची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. संघाने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 9 पैकी 5 सामन्यात विजय मिळवले आहेत. तर 3 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि 1 सामना बरोबरीत सुटला. पंजाब 11 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.
Comments are closed.