ग्लेन मॅकग्राच्या डोळ्यांदेखत दुसऱ्या बॉलरने त्याचा विकेटसचा रेकॉर्ड मोडला, कॉमेंट्री करत असतान

नॅथन लिऑनचा विक्रम मोडल्यानंतर ग्लेन मॅकग्रा रागावला : अ‍ॅडेलेडमध्ये सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑफ-स्पिनर नाथन लायन याने इतिहास रचला आहे. लायनने महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राचा मोठा विक्रम मोडीत काढला असून, हा क्षण पाहून ग्लेन मॅकग्राची प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅकग्राच्या या मजेशीर आणि भावनिक प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

नाथन लायनने ग्लेन मॅकग्राचा विक्रम कसा मोडला?

अ‍ॅडेलेड कसोटीच्या पहिल्या डावात नाथन लायनने आपला दुसरा बळी घेताच तो ग्लेन मॅकग्राच्या बरोबरीत आला. ओली पोपचा विकेट घेतल्यानंतर लायनने मॅकग्राचे 563 कसोटी विकेट्स पूर्ण केले. त्यानंतर बेन डकेटला बाद करताच लायनने मॅकग्राला मागे टाकत ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले.

किती सामन्यांत लायनने हा विक्रम मोडला?

ग्लेन मॅकग्राने आपल्या 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत 124 सामने खेळत 563 विकेट्स घेतल्या होत्या. या काळात त्यांनी 29 वेळा एका डावात पाच विकेट्स आणि 3 वेळा सामन्यात दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. मॅकग्राने अखेरची कसोटी खेळून 18 वर्षे उलटल्यानंतर नाथन लायनने त्यांचा हा विक्रम मोडला आहे. लायनने 141 कसोटी सामन्यांच्या 261व्या डावात आपला 564वा बळी बेन डकेटच्या रूपाने घेतला.

मॅकग्राची प्रतिक्रिया ठरली चर्चेचा विषय

नाथन लायनने विक्रम मोडताच समालोचन बॉक्समध्ये बसलेल्या ग्लेन मॅकग्राची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. आनंद, आश्चर्य आणि थोडी मजा अशा मिश्र भावनांत मॅकग्राने थेट खुर्ची उचलली… क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केलेला हा क्षण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर?

ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम महान फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या नावावर आहे. वॉर्न यांनी 708 विकेट्स घेतल्या आहेत. नाथन लायनने आता ग्लेन मॅक्ग्राला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे, तर मॅकग्रा 563 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. त्याचबरोबर डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा –

Jasprit Bumrah Angry : आधी बातचीत, मग जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! फोन हिसकावला अन् दिला फेकून…; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?, पाहा Video

आणखी वाचा

Comments are closed.