VIDEO: मैदानानंतर आता आकाशातही कमाल! ग्लेन फिलिप्सने लॅंड केलं विमान, म्हणाला, “पैसे असते तर…”

न्यूझीलंडचा स्टार खेळाडू ग्लेन फिलिप्सने दाखवून दिले की तो केवळ मैदानावरच अष्टपैलू नाही तर इतर क्षेत्रांमध्येही त्याच्यामध्ये अष्टपैलू क्षमता आहे. मैदानावर उत्तम झेल घेण्यासाठी हवेत सूर मारणारा फिलिप्स न्यूझीलंडमध्ये विमान उडविताना दिसला आहे. त्याने स्वत: त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर विमान उडवितानाचे फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत.
फिलिप्सने मंगळवारी (१७ मार्च) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला. त्यामध्ये तो विमान लॅंड (उतरवताना) करताना दिसत आहे. तसेच त्याने काही दिवसांपूर्वीही फोटो शेयर केले होते, ज्यामध्ये तो फ्लाइंग स्कूलमधील विद्यार्थी आणि प्रशिक्षकांशी संवाद साधताना दिसत आहे. तो आपला व्यावसायिक वैमानिक परवाना मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
फिलिप्सने पायलट बनण्याची आणि विमान वाहतूक क्षेत्रात काम करण्याची इच्छा दर्शवली. तो म्हणाला, “जर लहानपणी मी क्रिकेट खेळत नसतो आणि माझ्याकडे भरपूर पैसे असते तर क्रिकेटऐवजी विमानचालन क्षेत्र निवडले असते.”
“मला हवेत असणे खूप आवडते. मला पर्वतांमध्ये जायला आवडेल आणि अजिबात काम करावे लागणार नाही, केवळ माझ्या सर्व छंदांचा आनंद घेता येईल. पण तरीही मला काम करावे लागले, तर पायलट होणे ही माझी पहिली पसंती असेल,” असेही फिलिप्सने पुढे म्हटले आहे.
फिलिप्स आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे. त्याला फ्रॅंचायजीने २ कोटी रुपयांना संघात कायम ठेवले आहे. तसेच तो २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग राहिला. त्याचबरोबर तो २०२२-२०२४मध्ये सनरायझर्स हैद्राबादमध्ये होता. आयपीएलमध्ये त्याचा अनुभव कमी आहे. त्याने ८ सामने खेळले असून ६५ धावा केल्या आहेत.
Comments are closed.