आगीत ‘तेल’! यूएई ‘ओपेक’मधून बाहेर; इंधनाचे दर आणखी भडकणार
इराण-अमेरिका युद्धामुळे जगात इंधनटंचाईचे संकट निर्माण झाले असतानाच संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) आज नवा झटका दिला. यूएईने तेल निर्यातदार देशांच्या ‘ओपेक’ आणि ‘ओपेक प्लस’ संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली. यूएईच्या या निर्णयामुळे इंधन पुरवठा साखळी आणखी विस्कळीत होणार असून तेल व गॅस महागण्याची शक्यता आहे.
‘ओपेक’ ही तेल निर्यातदार देशांची संघटना आहे. तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन, पुरवठा आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्याचे काम ‘ओपेक’ करते. त्यामुळे जगभरातील तेलाच्या किमती स्थिर असतात. कोणत्याही देशाला मनमानी करता येत नाही.
- होर्मुझबंदीमुळे सध्या इंधन उत्पादन व पुरवठा दोन्ही घटले आहेत. अमेरिका-इराण संघर्ष थांबून सगळे काही सुरळीत झाल्यानंतर साहजिकच सर्व देश तेलाचे उत्पादन वाढवणार आहेत. ‘ओपेक’चे नियंत्रण नसल्यामुळे त्यावेळी यूएईला चढ्या भावाने तेल विकता येणार आहे. ‘ओपेक’ संघटनेवर याचा दबाव येऊन हे देशही किमती वाढवण्याची भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्याचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता आहे.
इराण कोसळलाय! होर्मुझ खुले करण्याची याचना करतोय!
‘इराण पुरता कोसळला आहे. उद्ध्वस्त झाला आहे. होर्मुझ भोवतीची नाकेबंदी उठवण्याची याचना तो माझ्याकडे करतो आहे,’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. ‘टथ सोशल’ या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ट्रम्प यांनी या संदर्भात पोस्ट केली आहे.’
Comments are closed.