गोव्याच्या साध्वी सीलला 'मिस इंडिया वर्ल्ड'चा मुकुट

केआयआयटी भुवनेश्वरमध्ये पार पडली स्पर्धा : महाराष्ट्राची राजनंदिनी उपविजेती

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

केआयआयटी भुवनेश्वरमये 61 व्या मिस इंडिया वर्ल्ड स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले, या सौंदर्यस्पर्धेत गोव्याची साध्वी सैल हिने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा मान पटकाविला आहे. मिस इंडिया 2024 ची विजेती निकिता पोरवालने साध्वीला मुकूट परिधान केला आहे.

तर या स्पर्धेत पहिली उपविजेती महाराष्ट्राची राजनंदिनी पवार राहिली आहे. तर द्वितीय उपविजेती होण्याचा मान जम्मू-काश्मीरच्या अद्वैता हिला मिळाला आहे. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांच्या सौंदर्यवतींनी भाग घेतला होता.

फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा पुरस्कार पटकाविणरी साध्वी सैल हिला बालपणापासूनच क्रिएटिव्हिटीची आवड राहिली आहे. स्वत:च्या अत्यंत शांत स्वभाव आणि एकाग्रतेच्या वैशिष्ट्याद्वारे उर्वरित स्पर्धकांवर मात केली आहे. साध्वीचे बालपण गोव्यात गेले असले तरीही कारकीर्द घडविण्यासाठी तिने मुंबईत स्थलांतर केले होते.

7 भाषांमध्ये पारंगत

साध्वी सैल ही 7 वेगवेगळ्या भाषांमध्ये पारंगत आहे. साध्वीने कॅनडाच्या एका विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ‘डबल मेजर’ पेल आहे. मिस वर्ल्ड इंडियामध्ये सामील होण्यापूर्वी ती अनेक सौंदर्यस्पर्धांमध्ये सामील झाली होती. तसेच अनेक दिग्गज ब्रँडसाठी तिने कॅम्पेनही केले होते.

 

 

 

 

 

Comments are closed.